बॉलिवूडची ‘मेलोडी क्वीन’ आणि ‘स्वर कोकिळा’ लता मंगेशकर या दोघी बहिणींचं नातं जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची गायकी आणि त्यांच्या प्रतिभेने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. वडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या भाऊ-बहिणींचा मुलांप्रमाणे सांभाळ केला. आशा भोसलेंच्या आयुष्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिका फार मोलाची होती. या दोघी बहिणींच्या नात्यात कितीही दुरावे आले तरी आजही या दोघींमधलं नातं तसंच आहे. याचंच उत्तम उदाहरण इंडियन आयडलच्या सेटवर दिसून आलं.
‘मेलोडी क्वीन’ आशा भोसले या त्यांची मोठी बहिण लता मंगेशकर यांची नक्कल करताना दिसून आल्या. ‘इंडियन आयडल १२’ या शोच्या सेटवर आशा भोसले यांनी लता दीदींची अगदी हुबेहूब नक्कल केलीय. नुकतंच शोच्या मेकर्सनी या विकेण्ड स्पेशल एपिसोडचा नवा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये आशा भोसलेंनी लता दीदींची केलेली नक्कल पाहून सर्व प्रेक्षक अवाक झाले. या प्रोमोमध्ये आशा भोसलेंनी मोठ्या बहिणीचं केलेलं अनुकरण पाहणं खरंच मजेदार आहे. तसंच लता दिदींसोबतचा एक किस्सा देखील त्यांनी या मंचावर शेअर केलाय.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहचलाय. यंदाच्या आठवड्यातील एपिसोडमध्ये ‘मेलोडी क्वीन’ आशा भोसले यांचा खट्याळ अंदाज पहायला मिळणारेय. या एपिसोडमध्ये शोमधील स्पर्धकांनी आशाताईंची गाजलेली गाणी सादर केली. यात शोमधील स्पर्धक निहालने आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांचं गाजलेलं गाणं ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ हे गाणं अगदी दिलखेचक अंदाजात गायलं. हे गाणं ऐकून आशा भोसले यांनी या गाण्याचा एक किस्सा शेअर केला.
यावेळी आशा भोसले म्हणाल्या, “आजा आजा मैं हूं प्यार तेरा या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आधी मी खूप घाबरली होती. गाण्याच्या रेकॉर्डिंग आधी मी लता दीदींच्या रूममध्ये गेली. लता दीदींनी मला पाहून अगदी सहज विचारलं, काय झालं, इतकी घाबरली का आहेस? त्यावर उत्तर देताना आशा भोसले म्हणाल्या, एक गाणं आहे. पण ते गाण्यासाठी खूप भीती वाटतेय. माहित नाही या गाण्याची रेकॉर्डिंग करणं मला जमेल की नाही.”
View this post on Instagram
यावेळी लता दीदींची अगदी हुबेहुब नक्कल करत आशा भोसले म्हणाल्या, “यावर लता दीदींनी मला सांगितलं, तू विसरतेय की आधी तू मंगेशकर आहेस आणि मग भोसले झालीस. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जा आणि ते शानदार होणार.”