छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ नेहमीच चर्चेत असतो. यावेळी हा शो गायिका आशा भोसले यांच्यामुळे चर्चेत आला आहे. आशा भोसले यांनी ‘इंडियन आयडल १२’ मध्ये हजेरी लावली होती. या एपिसोड दरम्यान स्पर्धकांनी आशा भोसले यांची सुपर हिट गाणी गायली. त्यावेळी आशा यांनी त्यांच्या या गाण्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. आशा ताईंनी १९६६ मध्ये ‘तीसरी मंजिल’ या चित्रपटातील ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ हे सुपर हिट गाणं गायलं होतं.

एका स्पर्धकाने आशा ताईंचे ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ हे गाणं गायलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर आशा ताईंनी त्यांच्या या गाण्याविषयी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “एक वेळ अशी होती की हे गाणं गायला पाहिजे की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर होता. ‘आज आजा मैं हूं प्यार तेरा’ हे गाणं गाण माझ्यासाठी खूप कठीण होते. आरडी बर्मन साहेब एके दिवस माझ्या घरी आले, बाजा घेऊन मला हे गाणं गाण्याची विनंती करत होते. जेव्हा मी त्यांना ‘ओ आ जा आह आह’ हे ऐकवल तेव्हा मला थोड आश्चर्य वाटलं, कारण ते मी करू शकेन असे मला वाटले नव्हते. तरी, मी चार ते पाच दिवसांनंतर हे गाणं गाण्याचा प्रयत्न करेन असे मी बर्मन साहेबांना सांगितले,” असे आशा ताई म्हणाल्या.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

पुढे त्या म्हणाल्या, “मी माझ्या गाडीत या गाण्याचा रियाज करायला सुरुवात केला. या गाण्याच्या मुख्य सुराचा इतका रियाज सुरु केला की, माझा ड्रायव्हर घाबरला. एक दिवस जेव्हा आम्ही हाजी अलीला पोहोचलो तेव्हा माझ्या ड्रायव्हरने अचानक मला विचारले की मला रुग्णालयात जायचे आहे का? कारण त्याला वाटले की मला श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि त्यामुळे मी दमली आहे. हे सगळ मी त्या गाण्याचा रियाज करताना झालं होतं. मात्र, तो खरोखर मजेदार क्षण होता.”

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

आशा ताई पुढे म्हणाल्या की, “जेव्हा त्यांनी दीदी लता मंगेशकर यांच्याशी या गाण्याबद्दल विचारले. तर लता दीदी म्हणाल्या, तू विसरलीस का की तू एक मंगेशकर आहेस. गाणं गा जा. तू खूप चांगल काम करशील आणि त्यानंतर हे गाणं त्यावेळचं सगळ्यात गाजलेलं गाणं ठरलं.” आशा भोसले यांच्याबरोबर या गाण्यात मोहम्मद रफीचा आवाजही आहे.