‘शार्क टँक इंडिया’चा माजी शार्क अश्नीर ग्रोव्हरने आता लेखक चेतन भगतवर निशाणा साधला आहे. चेतनचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘दोगलापन’ हे पुस्तक त्याने गम्मत म्हणून लिहिलं आहे आणि ते पुस्तक प्रत्यक्षात लिहिण्यापेक्षा प्रकाशित होण्यास जास्त वेळ लागला. चेतन भगत आणि अंकुर वारीकू सारखे लोक मोकळा वेळ घालवण्यासाठी पुस्तक लिहितात, अशी टीका एका विद्यापीठात नुकत्याच झालेल्या चर्चेत बोलताना अश्नीरने केली.

“लोकांना वाटतं पुस्तकं लिहिणं एक काम आहे. पण असं नाही, चेतन भगत आणि अंकुर वारीकूजवळ कामं नाहीत, म्हणून ते त्यांचं रिकामेपण पुस्तकं लिहून जस्टिफाय करतात. ते त्यांचा फालतू वेळ घालवण्यासाठी अशी पुस्तकं लिहितात,” अशा शब्दांत अश्नीरने दोघांची खिल्ली उडवली. खरं तर चेतन भगत हा आयआयटी आणि आयआयएम पदवीधर असून तो बेस्ट सेलिंग लेखक बनला आहे. तर, वारीकू हा एक उद्योजक असून तो इंटरनेटवर माहिती पुरवणारा कंटेंट तयार करतो.

“सर्व शार्क्सना अनफॉलो केलंय” अश्नीर ग्रोव्हरचा ‘शार्क टँक’बद्दल खुलासा म्हणाला, “त्यांना १० हजार कोटींचा…”

अश्नीरने जीवनात खरोखर काहीतरी साध्य करायचे असल्यास आयआयटी किंवा आयआयएममधून पदवी घेणं किती महत्त्वाचं नाही हेदेखील सांगितलं. “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला आयुष्यात अनेक आयआयटी आयआयएम वाले लोक भेटतील. त्यांच्या तो ठप्पा असेल, कारण ते लोक आठवी-नववी पासून याची तयारी करतात. मग आयआयटी किंवा आयआयएममध्ये निवड झाल्यानंतर त्यांना वाटतं की त्यांनी आयुष्यात खूप काही करून घेतलं. पण खरं तर तसं काहीच नसतं. आयआयटी, आयआयएममध्ये देखील ८०% लोक तिथेच अडकून पडतात आणि २०% लोक जाण्याचा हेतू साध्य करतात. तुम्ही विचार करा, जो आयआयटीला जाऊन पण काहीच करू शकला नाही, त्याला आतून कसं वाटत असेल,” असं अश्नीर म्हणाला.

तब्बूसह ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये कधीच घातली नाही बिकिनी, पाहा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्नीर पुढे म्हणाला, “सर्वात शेवटी फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे एखादी व्यक्ती करत असलेलं काम. त्याची डिग्री नाही. डिग्री हा पैसा कमावण्याचा एक मार्ग आहे आणि पालक त्यासाठी पैसे खर्च करतात.”