मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. आपल्या विनोदी भूमिकांमधून तर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं. आज अशोक सराफ हे त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. याचनिमित्ताने त्यांच्याशी निगडीत एक किस्सा आपण आज जाणून घेणार आहोत.

एखादी वस्तू किंवा गोष्ट आपल्यासाठी लकी ठरते हा अनुभव आपल्याला बऱ्याचदा आला असेल. अभिनेत्यांच्या बाबतीत पण आपल्याला असे अनेक किस्से पाहायला मिळतात. अशोक मामांच्या बाबतीतला असाच एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत. गेली ४८ वर्षं अशोक मामा यांच्या हातातील बोटात एक अंगठी आपल्याला कायम दिसते, आज त्याच अंगठीमागचा किस्सा जाणून घेऊयात.

आणखी वाचा : अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ करतो ‘हे’ काम, भावावर आहे जीवापाड प्रेम, निवेदिता फोटो शेअर करत म्हणाल्या…

एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी ही आठवण शेअर केली होती. ही गोष्ट साधारण ७० च्या दशकातील आहे. विजय लवेकर हे तेव्हा मनोरंजनसृष्टीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असत, शिवाय ते अशोक सराफ यांचे चांगले मित्र होते. विजय लवेकर यांचं छोटेखानी सोन्या चांदीचं एक दुकानही होतं. एकेदिवशी ते अंगठ्यांनी भरलेला एक बॉक्स घेऊन स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी अशोक सराफ यांना आवडेल ती अंगठी घेण्यास सांगितले. ही अंगठी साधी सुधी नव्हती तर त्यावर नटराजचं चित्र कोरलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अंगठीमुळे अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण मिळालं. बरेच दिवस अशोक मामा चित्रपटात चांगली भूमिका मिळवण्यासाठी धडपडत होते. पण असं म्हंटलं जातं ही अंगठी बोटात घालताच त्यांना पुढील काही दिवसांत ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाची ऑफर आली. यानंतर अशोक सराफ यांनी ती अंगठी आजतागायत काढलेली नाही. अशोक सराफ यांच्या चित्रपटात तुम्हाला त्यांच्या लाजवाब अभिनयाबरोबरच त्यांच्या बोटातील ही अंगठीसुद्धा कायम दिसेल.