बॉलिवूडमधील बहुचर्चित दिग्दर्शकांच्या यादीमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचाही नंबर लागतो. राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. पण त्याचबरोबरीने सोशल मीडियावर तरुण अभिनेत्रींबरोबरचे त्यांचे व्हिडीओ, फोटो अधिक चर्चेचा विषय ठरत असतात. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या या दिग्दर्शकाला बऱ्याचदा ट्रोल देखील केलं जातं. राम गोपाल वर्मांनी आता देखील एका अभिनेत्रीसोबतचा बोल्ड व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

राम गोपाल वर्मा सतत कोणत्या अभिनेत्रीबरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात याबाबत अनेक प्रश्न नेटकऱ्यांना होते. तर राम गोपाल वर्मांबरोबर सतत दिसणारी अभिनेत्रीचं नाव आहे अप्सरा. अप्सरा त्यांच्या ‘खतरा : डेंजरस’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अप्सराने अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. याच अभिनेत्रीबरोबर राम गोपाल वर्मा सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.

आणखी वाचा – “त्याने ‘द कश्मीर फाइल्स’ची खोटी स्तुती केली”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे अक्षय कुमारवर गंभीर आरोप

राम गोपाल वर्मा आणि अप्सरा दोघंही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांसोबतचे हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. वयाच्या ६०व्या वर्षी देखील राम गोपाल वर्मा इतके बोल्ड फोटो शेअर करत असल्याने बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. अप्सराबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करणं बहुदा त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनचा हा भाग असावा. तरी देखील नेटकऱ्यांना त्यांचं हे वागणं पसंतीस पडलं नसल्याचंच नेहमी दिसून येतं.

आणखी वाचा – VIDEO : बोल्ड ड्रेसमुळे रुबिनाची फजिती, घडलं असं की फोटोसाठी पोझ देणंही झालं कठीण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघांचे पार्टी दरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विविध विषयांवर आधारित चित्रपट बनवण्यात राम गोपाल वर्मांचा हातखंड आहे. त्यांनी हिंदीसह अनेक तेलुगू चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केलं आहे. राम गोपाल वर्मांचा सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट ‘खतरा : डेंजरस’ अखेरीस ८ एप्रिल २०२२ ला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.