scorecardresearch

लग्नाच्या चर्चेदरम्यान अथिया शेट्टी आणि केएल राहुलने घेतले भाडेतत्वावर घर, भाडे ऐकलेत का?

अथिया आणि केएल राहुलने हे घर मुंबईत घेतले आहे.

athiya shetty, kl rahul,
अथिया आणि केएल राहुलने हे घर मुंबईत घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल हे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे. अथिया आणि केएल राहुल गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यात आता ते दोघे एकत्र राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, अथिया आणि केएल राहुलने वांद्रे येथील कार्टर रोड येथे सीफेसिंग 4BHK फ्लॅट भाडेतत्वावर घेतले आहे आणि काही काळासाठी ते तिथेच राहणार आहेत. भाडेतत्वावर घेतलेल्या या फ्लॅटचे भाडे हे दरमहा १० लाख रुपये आहे. दुसरीकडे हे दोघे लवकर लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना त्यांच्या एका जवळच्या मित्राने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यंदाच्या वर्षी अथिया आणि केएल राहुल लग्न करणार नसल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत आणि सुमारे एक वर्षापूर्वी त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिक झाले होते. केएल राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने अथियाने एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Athiya shetty and kl rahul to move into a rented apartment in mumbai dcp