scorecardresearch

“या सर्व केवळ अफवा…” केएल राहुल- अथियाच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ अहान शेट्टीनं सोडलं मौन

भाऊ अहान शेट्टीने के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

athiya shetty, ahan shetty, kl rahul, athiya kl rahul wedding, suniel shetty daugter, athiya shetty wedding, अथिया शेट्टी, के एल राहुल, आथिया के एल राहुल वेडिंग, सुनील शेट्टी, सुनिल शेट्टी मुलगी, आथिया शेट्टी लग्न
अथियाचा भाऊ अहान शेट्टीनं मात्र बहिणीच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कूपर यांच्यानंतर सध्या बी टाऊनमध्ये अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या दोघांच्या लग्नाबाबत नेहमीच काही ना काही अपडेट समोर येत असतात. दोघंही डिसेंबर २०२२ म्हणजेच वर्षाअखेरीस लग्नाच्या बेडीत अडकणार असा दावा देखील काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. पण आता अथियाचा भाऊ अहान शेट्टीनं मात्र बहिणीच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अथिया आणि के एल राहुलचे चाहते हैराण झाले आहेत.

नुकत्याच ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत अहान शेट्टी म्हणाला, “आम्ही दरवर्षी आमच्या आजोबांच्या घरी ईद सेलिब्रेशन करतो आणि लग्नाबद्दल बोलायचं तर अशा प्रकारची कोणतीही तयारी आम्ही करत नाही आहोत. लग्नाशी संबंधित कोणताही कार्यक्रम आमच्या घरी आयोजित करण्यात आलेला नाही. या सर्व गोष्टी केवळ अफवा आहे. जर लग्नच होत नाहीये तर मग मी तुम्हाला लग्नाची तारीख काय सांगू. अद्याप त्यांचा साखरपुडा झालेला नाही आणि येत्या काही महिन्यांमध्ये अशा कोणत्याच गोष्टीचं आमचं प्लॅनिंग नाहीये.”

आणखी- “सर्वकाही परफेक्ट असूनही…” सासरी घडणाऱ्या ‘या’ गोष्टीला त्रासली आहे करीना कपूर

दरम्यान अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी तिच्या खाजगी आयुष्यामुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. अथिया आणि क्रिकेटपटू के एल राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. तसेच काही दिवसांपूर्वीच वांद्रे येथील पाली हिल परिसरात के एल राहुलने कोट्यावधी रुपयांचं घर खरेदी केलं असल्याची बातमी समोर आली होती. अथिया-के एल राहुल डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. मात्र आता अहाननं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Athiya shetty bother ahan shetty open up about his sister and kl rahul wedding mrj

ताज्या बातम्या