‘अवतार: द वे ऑफ वाटर’ चित्रपट काल प्रदर्शित झाला. याच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून भारतात तब्बल ४ कोटी रुपये कमावले होते. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘दृश्यम २’लाही मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दृश्यम २’ हा या वर्षातील भारतातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५ कोटींची कमाई केली होती. तर आता ‘अवतार २’ ‘दृश्यम २’ला जबरदस्त टक्कर देताना दिसतोय. काल प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ने ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत मोठी कमाई केली. ‘दृश्यम २’च्या जवळपास अडीच पट जास्त केली ‘अवतार २’ने पहिल्या दिवशी केली आहे.

आणखी वाचा : Video: वादात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ गाण्याचं कौतुक करणाऱ्याला दीपिका पदुकोणने दिलं ‘हे’ उत्तर, व्हिडीओने वेधलं लक्ष

काही हजार स्क्रीन स्वर भारतात प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘अवतार २’चा हा रेकॉर्ड बघता दोन-चार दिवसातच तो १०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाचे भारतभर सर्वच शो हाऊसफुल होत आहेत.

हेही वाचा : ‘अवतार २’ला मोठा फटका, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन साईट्सवर लीक

२००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. शिवाय येणाऱ्या काही वर्षात या चित्रपटाचे आणखी ३ भाग बघायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avatar 2 collected huge amount on the opening day rnv
First published on: 17-12-2022 at 14:02 IST