राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. त्यानंतर आता चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘आरआरआर’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे.

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे. याबरोबरच जगभरातील दिग्गज कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहेत. ‘अवतार’सारखे भव्य चित्रपट देणारे जेम्स कॅमेरून यांनीसुद्धा राजामौली यांच्या चित्रपटाचं आणि दिग्दर्शनाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : “रणबीर कपूरमधील ‘हा’ गुण रणवीर सिंगमध्ये नाही”; सिनेअभ्यासक तरण आदर्श यांचा मोठा खुलासा

‘क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड’च्या सोहळ्यात जेम्स कॅमेरून यांनी राजामौली यांची भेट घेऊन त्यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा केली. खुद्द राजामौली यांनी जेम्स यांच्याशी गप्पा मारतानाचे फोटोज शेअर करत पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये ते म्हणाले, “द ग्रेट जेम्स कॅमेरून यांना आरआरआर हा चित्रपट एवढा पसंत पडला की त्यांनी त्यांच्या पत्नीला तो बघायला सांगितला आणि तिच्याबरोबर त्यांनीही तो दुसऱ्यांदा पाहिला. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तुम्ही आमच्याशी या चित्रपटाबद्दल तब्बल १० मिनिटं चर्चा केली. तुमचे खूप खूप आभार.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली. जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.