अभिनेत्री आयशा उमर ही पाकिस्तानीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आयशाचं नाव घेतलं जातं. पण तिचं नाव टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकशी जोडलं गेल्यानंतर ती भारतातही प्रसिद्धीच्या झोतात आली. शोएब मलिकबरोबर आयशा उमरचे बरेच रोमँटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. आता आयशाने शोएबबरोबरचे रोमँटीक फोटो आणि अफेअरच्या चर्चा यावर भाष्य केलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघंही एकमेकांपासून वेगळं होऊ इच्छितात असं बोललं गेलं होते. अशातच आयशा आणि शोएब यांचा एक रोमँटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आयशा आणि शोएब यांचा रोमँटीक अंदाज पाहून सगळेच हैराण झाले होते आणि आयशामुळे सानियाचा संसार मोडला असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. त्यामुळे आयशा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होता.
आणखी वाचा- सीमेपलीकडचं प्रेम, लग्न अन् १२ वर्षांनी घटस्फोट? ‘अशी’ होती सानिया मिर्झा-शोएब मलिकची Love Story
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयशाने शोएब मलिकबरोबरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी शोएब मलिकबरोबर एक प्रोफेशनल फोटोशूट केलं होतं. एखाद्या व्यक्तीचं अफेअर असेल तर ती व्यक्ती अशाप्रकारचं फोटोशूट ऑनलाइन पोस्ट कधीच करणार नाही. विवाहित लोकांच्या अफेअरबद्दल ऐकल्यावर मला त्रास होतो. मला विवाहित पुरुषाशी रिलेशनशिप ठेवायचं नाही आणि मी तसा विचारही कधीच करत नाही.”
आणखी वाचा- Photos : सानिया मिर्झाच्या बहिणीचाही झाला आहे घटस्फोट; दुसरं लग्न केलं अन्…
आयशा पुढे म्हणाली, “मला लग्न करायचं आहे आणि आई व्हायचं आहे. आयुष्यातील नवी सुरुवात करण्यासाठी मी तयार आहे. मात्र मला विवाहित पुरुष नकोय. माझं फोटोशूट चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांना सानिया शोएबच्या नात्यासाठी मला जबाबदार धरलं होतं. पण खरं तर हे फोटोशूट वर्षभरापूर्वीच झालं होतं.”