‘साराभाई वर्सेस साराभाई’फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा हिमाचल प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या टीव्ही मालिका, बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले होते.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा कशी करते मुलांना Impress? अभिनेत्रीने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

वैभवी उपाध्याय तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर हिमाचलमध्ये फिरण्यासाठी गेली होती. या वेळी प्रवासादरम्यान एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिच्या निधनावर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा : सुपरहिट मालिका अन् दीपिका पदुकोणबरोबर केलं होतं काम, अवघ्या ३२ व्या वर्षी अपघाती जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती?

वैभवी उपाध्यायने ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ ( Please Find Attached) या प्रसिद्ध वेब सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये आयुष मेहरा आणि बरखा सिंग यांच्याबरोबर काम केले होते. अभिनेत्रीच्या निधनानंतर आयुष मेहरा आणि बरखा सिंगने सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करीत भावूक पोस्ट केली आहे. अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवरील गाजलेली वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ यामध्ये वैभवीने आयुष मेहरा आणि बरखा सिंगबरोबर काम केले होते.

हेही वाचा : Video : पापाराझींनी फोटोसाठी थांबवल्यावर अनुष्का शर्माने स्पष्टच सांगितले, म्हणाली, “बच्चा साथ में…”

बरखा सिंगने लिहिले की, “तुझ्याबद्दल सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण, आज माझ्याकडे शब्द नाहीत.” तसेच “आपल्या जीवनात कधी काय घडेल सांगू शकत नाही. वैभवी तुझ्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसलाय…आयुष्यात तुझ्यासारख्या चांगल्या कलाकराबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यचं…तुझ्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे…RIP” अशी भावूक पोस्ट आयुष मेहराने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ मध्ये अभिनेत्री वैभवी उपाध्यायने साकारलेल्या ‘टीम लीडर रत्ना घोष’च्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.