scorecardresearch

“हाता-पायाला काळा धागा बांधण्याची…”, आयुष्मान खुरानाने मुंबईकरांना दिलेला सल्ला चर्चेत

आयुष्मान खुरानाने मुंबईकरांना दिला विशेष सल्ला

“हाता-पायाला काळा धागा बांधण्याची…”, आयुष्मान खुरानाने मुंबईकरांना दिलेला सल्ला चर्चेत
आयुष्मान खुरानाने मुंबईकरांना दिला विशेष सल्ला

अभिनेता आयुष्मान खुराना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे आगामी चित्रपट, गाणी, खाजगी आयुष्य, परदेशी ट्रिप यासर्वांचे अपडेट तो त्याच्या चाहत्यांना नेहमी देत असतो. सध्या तो ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी त्याने ‘डॉक्टर्स डे’च्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. नुकताच आयुष्मानने एक नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने लक्षवेधी कॅप्शन दिले आहे.

मान्सूनमुळे मुंबईत व्हायरल इनफेक्शन वेगाने पसरत आहे. आयुष्मान खुरानाने यावरून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले आहे. ‘मी विमानात सीट १A वर बसलो आहे. पुन्हा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मुंबईमध्ये खूप जणांना व्हायरल इन्फेकशन झाले असल्याचे समजले. यादरम्यान मी एक ग्लास कोमट पाणी पिऊ इच्छितो. तुम्ही त्यात काळी मिरी पण घालू शकता. हाता-पायाला काळा धागा बांधण्याची गरज आहे, कारण आपल्याला नजर लागली आहे.’

आणखी वाचा – अभिनेता आयुष्मान खुराना झळकणार डॉक्टरच्या भूमिकेत, चित्रपटाचा लूक शेअर करत म्हणाला…

आणखी वाचा – पत्नी ताहिरा कश्यपने सेक्स लाइफवर लिहिलेल्या पुस्तकाबाबत आयुषमान खुरानाने केले वक्तव्य, म्हणाला…

‘डॉक्टर जी’ या आगामी चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत स्वत: आयुष्मान झळकणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रकुलप्रीत आणि आयुष्मान स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करत आहेत. आयुष्मान आणि रकुल व्यतिरिक्त या चित्रपटात शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आयुष्मान ‘अॅक्शन हिरो’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ayushmann khurrana gave special advice for mumbai fans suffering from viral infections pns