महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोना आणि ओमायक्रॉचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार, अभिनेते-अभिनेत्री यांना करोनाची लागण झाली आहे. यानंतर आता ‘बाहुबली’ या प्रसिद्ध चित्रपटात ‘कटप्पा’ची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यराज करोनाची लक्षण आढळल्यानंतर काही दिवस ते होम आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर सत्यराज यांना करोनाची गंभीर लक्षणे दिसू लागली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सध्या चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे चाहते सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत आहेत.
कपिल शर्माने उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली, म्हणाला “अचानक रात्री ८ वाजता…”
अभिनेते सत्यराज व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. अभिनेता विष्णू विशालपासून महेश बाबू, शोभना, मधुर भांडारकर, सोनू निगम, अर्जुन रामपाल, एकता कपूर आणि राजेंद्र प्रसादपर्यंत अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.