कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण, स्ट्रगलर साला या वेब सिरीज नंतर बॅक बेंचर्स या तिस-या वेब सिरीजची नव्याने भर पडत आहे. बॅक बेंचर्स या वेब सिरीजचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
बॅक बेचर्स हे नाव वाचूनचं कळतं की ही वेब सिरीज नक्कीच शाळेतील आठवणी ताज्या करेल. या वेब सिरीजमध्ये मराठीतील सेलिब्रेटी त्यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा देणार आहेत. मागच्या बाकावर बसणा-या या सेलिब्रेटींमध्ये शशांक केतकर, किशोरी आंबिये, तेजश्री प्रधान, सौरभ गोखले आणि अशा अनेकजणांचा समावेश आहे. तर तुमच्या आवडत्या कलाकाराचा मागच्या बाकावरचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून काही दिवस थांबावे लागेल. लवकरचं ही वेब सिरीज तुम्हाला पाहता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
मागच्या बाकावर.. मराठीतील ‘बॅक बेंचर्स’
तुमच्या आवडत्या कलाकारांचा मागच्या बाकावरचा अनुभव
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 24-05-2016 at 15:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Back benchers magchya bakavar marathi web series