‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता नकुल मेहता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच नकुलने एक असा फोटो शेअर केलाय ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आलाय. रणवीर सिंगप्रमाणेच नकुलने त्याचा एक न्यूड फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.
सध्या सगळीकडेच रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्याचं कौतुक केलंय तर काहीजण त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. अशातच अभिनेता नकुल मेहताने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक न्यूड फोटो शेअर केलाय. अगदी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोप्रमाणे यात नकुलने पोज दिलेली दिसतेय. तसंच फोटोमधील कार्पेटही सेम असल्याचं दिसतंय. त्यामुळे रणवीरच्या पावलांवर पाऊल ठेवत नकुलनेही न्यूड फोटोशूट केलं असं कुणालाही वाटेल. मात्र प्रत्यक्षात नकुलने कोणतही न्यू़ड फोटोशूट केलेलं नाही. खरं तर नकुलने शेअर केलेला फोटो पूर्णपणे त्याचा नाही. तर हा फोटो त्याने मॉर्फ म्हणजेच एडिट केलाय. रणवीरच्या चेहऱ्याच्या जागी त्याने स्वत:चा चेहरा लावून फोटो एडिट केला आहे.
हे देखील वाचा: तब्बल तीन तास कपड्यांशिवाय होता रणवीर, फोटोग्राफरनं सांगितलं कसं झालं शूटिंग
या फोटोला नकुलने हटके कॅप्शन दिलंय. “टीका करणारे म्हणतील की मी रणवीर सिंगचं कार्पेट उधार घेतलंय” असं तो कॅप्शनमध्ये म्हणाला आहे. नकुलच्या हटके पोस्टवर टेलिव्हिजनवरील अनेक सेलिब्रिटींनी धमाल कमेंट करत नकुलच्या कल्पकतेचं कौतुक केलंय. तर या फोटोवर नकुलच्या पत्नीने केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं. “तुझ्याकडे खूप बॉक्सर आहेत. जा आधी कपडे घाल.”असं ती कमेंटमध्ये म्हणाली.
हे देखील वाचा: अभिनेता रणवीर सिंहविरुद्ध गुन्हा ; नग्न छायाचित्रामुळे वाद
नकुलच्या मित्र, मैत्रीणींनी धमाल कमेंट केल्या आहेत. अभिनेता करणवीर बोहराने लिहिलं, “मला वाटतं तूही असं फोटोशूट करायला हवं” तर अभिनेत्री अदिती शर्मा म्हणाली, “हाहाहा त्याची बॉडी देखील उधार घेतली.” याच सोबत ऋत्विक धनजानी, आहना कुमरा, शहबाज अजीम यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी नकुलच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.