टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल राहुल वैद्य आणि दिशा परमार हे दोघे त्यांच्या नव्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. हे दोघेही त्यांच्या लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. राहुल वैद्यने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोमॅण्टिक अंदाजातला एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो पत्नी दिशा परमारसाठी तिची नवी मालिका ‘बडे अच्छे लगते हैं २’चं गाणं गाताना दिसून येतोय.

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे दोघेही काही महिन्यापूर्वीच लग्नबंधनात अडकले. त्यांनतर दिशा परमारची नुकतीच ‘बडे अच्छे लगते हैं २’ ही नवी मालिका सुरू झालीय. तिच्या या नव्या मालिकेसाठी राहुल वैद्यने आपल्या खास अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक स्पेशल कॅप्शन देखील लिहिलीय. “तुझ्या नव्या मालिकेसाठी ऑल द बेस्ट दिशा परमार! मला खात्री आहे की तू तुझ्या दमदार अभिनयाने यातही यशस्वी होशील…तुझ्या शूटिंगचा पहिला दिवस…हा दिवस तू तुझ्या टीमसोबत एन्जॉय नक्की कर.” या कॅप्शनमध्ये त्याने #badeacchelagtehain2 हा हॅशटॅग देखील वापलाय.

दिशा-राहुलचा रोमॅण्टिक अंदाज

राहुलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिशा एका सोफ्यावर बसलेली दिसून येतेय. तिच्या नव्या मालिकेचं गाणं गाताना राहुल गिटार वाजवताना दिसून आला. त्याच्या रोमॅण्टिक अंदाजातलं गाणं संपल्यानंतर दिशा त्याला किस करते आणि त्याला थॅंक यू म्हणते. या दोघांच्या या रोमॅण्टिक अंदाजातला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

 

फॅन्सना भावला राहुलचा रोमॅण्टिक अंदाज

राहुलने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्स भलतेच फिदा झालेत. त्याच्या या व्हिडीओवर फॅन्स कमेंट्स करत त्याच्या गाण्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत. “राहुल परफेक्ट हसबंड मेटरिअल…अरे इतका कसा तू चांगला आहेस…”, “अमेजिंग लव बर्ड”, “बेस्ट कपल”, “पावरहाउस” अशा वेगवेगळ्या कमेंट्स देत फॅन्स त्याच्या गाण्याचं कौतुक करताना दिसून आले.

 

बडे अच्छे लगते हैं २ मध्ये दिशा-नकुल मेहताची जोडी

एकता कपूरची नवी मालिका ‘बडे अच्छे लगते हैं २’ मध्ये अभिनेत्री दिशा परमार सोबत अभिनेता नकुल मेहता झळकणारेय. या मालिकेच्या नव्या प्रोमोने फॅन्सचं मन जिंकलंय. हा शो लवकर सोनी टीव्हीवर सुरू होणारेय.