‘बाहुबली’ या सिनेमात राजमाता शिवगामी देवीची व्यक्तिरेखा अभिनेत्री रम्या कृष्णनने साकारली आहे. राजमातेचे निडर व्यक्तिमत्व, तिचा दरारा, रुबाब अनेकांनाच आवडला. माहिष्मती साम्राजाच्या या राजमातेचा बॉलिवूडशी फार जवळचा संबंध राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रम्याने आतापर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक सिनेमांत काम केले आहे. पण बॉलिवूडमधील तिच्या करिअरची सुरूवात १९८८ मध्ये आलेल्या फिरोज खान यांच्या ‘दयावान’ या सिनेमाने झाली. या सिनेमात तिने एक डान्सर म्हणून कॅमिओ केला होता. १९९३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या ‘खलनायक’ सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. पण हिंदी सिनेसृष्टीत तिला ‘चाहत’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमांसाठी विशेष करून ओळखले जाते. महेश भट्ट दिग्दर्शित ‘चाहत’ सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये शाहरुख खान आणि पूजा भट्ट होते.

‘चाहत’ सिनेमात रम्याची व्यक्तिरेखाही शाहरुखच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अशा एका मुलीची होती. शाहरुखला मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी असते. या सिनेमात नसिरुद्दीन शाह यानी रम्याच्या भावाची भूमिका साकारली होती. डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमात ती अमिताभ बच्चन यांच्या हिरोइनच्या भूमिकेत दिसली होती. ‘बडे मिया…’ हा पहिला सिनेमा आहे, ज्यात अमिताभ आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. या सिनेमात दोघांचीही दुहेरी भूमिका होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahubali fame ramya krishnan romanced with amitabh bachchan and shah rukh khan ssv
First published on: 15-09-2019 at 14:08 IST