निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्सालीच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’चा टीझर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोन, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.
संजय लीला भन्सालीच्या चित्रपटातील भव्यपणा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही पाहावयास मिळतो. तब्बल तीन मिनिटांच्या या टीझर ट्रेलरमध्ये बाजीरावच्या भूमिकेतील दिमाखदार रणवीर, राजेशाही थाटातील सौंदर्यवती काशीबाई म्हणजेच प्रियांका चोप्रा तर मस्तानीच्या भूमिकेतील दीपिकाचे लढाऊ आणि सोज्वळ रुप पाहावयास मिळते. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीर सिंगने बाजीराव पेशव्यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रियंका चोप्रा बाजीराव पेशव्यांची पहिली पत्नी काशीबाईच्या भूमिकेत आहे, तर मस्तानीची भूमिका दीपिकाने साकारली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2015 रोजी प्रकाशित
पाहाः ‘बाजीराव मस्तानी’चा टीझर ट्रेलर
निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्सालीच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’चा टीझर लाँच करण्यात आला आहे.

First published on: 20-07-2015 at 11:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajirao mastani official teaser trailer