भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाचे अगदी जवळचे संबंध आहेत हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. लतादीदी आणि बाळासाहेब यांच तर खास नातं होतं. बाळासाहेब हे लतादीदींना बहीण मानायचे. लतादीदींना बाळासाहेब ज्या प्रकारे राजकारण सांभाळायचे त्याती स्तुती कराच्या तर दुसरीकडे बाळासाहेब लतादीदींच्या मधूर आवाजाची स्तुती करायचे.
आणखी वाचा : लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूरचे नाते काय माहित आहे का?
त्या दोघांना एकमेकांना भेटायला कधी वेळ मिळाला नाही तरी ते दोघं एकमेकांच्या वाढदिवसाला नक्कीच घरी जाऊन भेट द्यायचे. एवढंच काय तर बाळासाहेबांच्या कलानगरच्या घरी संपूर्ण कुटुंब बऱ्याचवेळा जायचे. एकदा तर दोघं ही कुटुंब एकत्र आलं होतं. तेव्हा बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती.
आणखी वाचा : “जरा तरी लाज बाळग…”, कारमधला डान्स व्हिडीओ शेअर केल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल
पण लतादीदींनी बाळासाहेबांच्या या ऑफरला नकार दिला होता. लतादीदी म्हणाल्या, “बाळासाहेब, राजकारण हा आमचा प्रांत नाही. पण तुम्ही राजकारणाच्या माध्यामातून खूप चांगलं काम करत आहात. तुमच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा.” लतादीदींचं हे उत्तर ऐकूण बाळासाहेब आश्चर्यचकीत झाले होते. पण कुठेतरी बाळासाहेबांना लतादीदीनी दिलेलं उत्तर बरोबर असल्याचं वाटलं. पुढे बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न कधीच केला नाही.
बाळासाहेब यांच्या निधनानंतरही मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंबात दुरावा आला नाही. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मंगेशकर कुटुंबासोबत चांगले संबंध होते. मुंबईतील ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज त्याच ठिकाणी लतादीदींवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.