scorecardresearch

लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूरचे नाते काय माहित आहे का?

लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

shraddha kapoor, lata mangeshkar death,
लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. लतादीदींच्या राहत्या घरात अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही हजेरी लावली होती.

श्रद्धाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन २’ या चित्रपटात श्रद्धाने उडजा रे हे गाणं गायलं होतं. तिच्या या गाण्याचे प्रचंड कौतुक झाले होते. श्रद्धाच्या आईला शिवांगी कोल्हापुरे यांना हे गाणे फार आवडले होते. शिवांगी यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे एक प्रसिद्ध गायक आणि वीणावादक होते. त्यांच्याकडे श्रद्धाने काही वर्ष गाण्याची शिकवणीही घेतली होती. श्रद्धा म्हणाली की, माझ्या घरामध्येच गाण्याचे संस्कार आहेत. माझे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे स्वतः उत्तम गायक होते आणि लता मंगेशकर या माझ्या मावशी आजी आहेत. त्यामुळे गायन हे तर माझ्या कुटुंबाच्या नसानसात भरलेलं आहे. श्रद्धासोबत या चित्रपटात फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत दिसले.

आणखी वाचा : “जरा तरी लाज बाळग…”, कारमधला डान्स व्हिडीओ शेअर केल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल

आणखी वाचा : अभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली फोटो शेअर करत, म्हणाला…

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2022 at 18:00 IST