वयाच्या पन्नाशीनंतरही बॉलिवूडमध्ये सलमान खानने आपली छाप प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवली आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटाची कमाईमुळे त्याची जादू वेळोवेळी दिसून येते. बॉक्स ऑफिसवर फक्त त्याचा सिनेमाच फक्त मोठा गल्ला जमा करतो असे नाही. तर कमाईच्या बाबतीत सलमान हा महागड्या कलाकारांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या कमाईप्रमाणेच त्याचा बँक बॅलन्ससुध्दा मजबूत असाच आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सलमान खानचा समावेश होतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, सलमानच्या बॅक खात्यामध्ये २३० दशलक्ष डॉलर इतकी राशी जमा आहे. सलमानच्या सध्याच्या चित्रपटाच्या कमाईनंतरचा आकडा यापेक्षा निश्चितच अधिक असेल.
बॉलिवूडप्रमाणे सलमान छोट्या पडद्यावरही धमाल करताना दिसतो. सलमान ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘बिग बॉस’चा सूत्रसंचालक-निवेदक म्हणून दिसत आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड प्रेक्षकवर्ग मिळाला. आता ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात देखील तो सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागासाठी सलमान जवळ जवळ पाच कोटी रुपये मानधन घेतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची कमाई ही सध्याच्या सलमान खान आणि आमिर खान पेक्षा कमी आहे. बॉलिवूडमध्ये कमाईच्या बाबतीत तीन खानमंडळींमध्ये स्पर्धा दिसून येते. या तीन खानमध्ये सलमान पेक्षाही अधिक कमाई शाहरुख खान करतो. त्यामुळे शाहरुखच्या बँक खात्याची राशीही सलमानच्या तुलनेत अधिक आहे. सलमान खान सध्या आपल्या ‘ट्युब लाईट’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये भारत आणि चीन युद्धाच्या कथानकावर आधारित आहे. यामध्ये सलमान खानने भारतीय सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत झू झू ही चीन अभिनेत्री झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लडाख आणि मनाली परिसरात सुरु आहे. ताज्या वृत्तानुसार या चित्रपटात मोहम्मद जीशान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank balance of sultan star salman khan and box office collection
First published on: 28-10-2016 at 01:01 IST