‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ या आगामी हॉलिवूडपटात एकापेक्षा जास्त खलनायक असल्याचे समजते. बॅटमॅन आणि सुपरमॅनच्या पुन्हा एकदा एकत्र येण्याने हा चित्रपट अधिपासूनच चर्चेत आहे. लॅटिनो रिव्ह्यू वेबसाईटमधील वृत्तानुसार ‘दी सोशल नेटवर्क’ चित्रपटातील अभिनेता जेस इसेनबर्ग लेक्स लुथरची व्यक्तिरेखा साकारत असून, चित्रपटात अन्य तीन खलनायक असल्याचे बोलले जात आहे. मेटल्लो आणि दी जॉकर चित्रपटाचा भाग असल्याच्या वृत्ताचे सदर वेबसाइटकडून खंडण करण्यात आले आहे. ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’च्या अमेरिकेतील प्रदर्शनासाठी ६ मे २०१६ ही तारीख निश्चित करण्यात आली असून, या चित्रपटाद्वारे झॅक स्नायडर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. हेन्री कविल सुपरमॅनच्या भूमिकेत, तर बेन अफ्लिक कॅप्ड क्रुसडरच्या भूमिकेत दिसणार आहे, अॅमी अडम्स पुन्हा एकदा लॉइस लेनची भूमिका साकारत असून, गल गडॉट वंडर वुमनची व्यक्तिरेखा साकारणार आहे.