बॉलिवूडचा पार्श्वगायक बेनी दयाल रविवारी लग्नगाठीत अडकला. त्याची प्रेयसी मॉडेल व अभिनेत्री कॅथरीन थांगम हिच्याशी त्याने विवाह केला.
बत्तमीझ दिल या गाण्यावर तरुणाईला थिरकायला लावणा-या या ३२ वर्षीय गायकाच्या लग्नाच्या बातमीला सर्वप्रथम संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी याने दुजोरा दिला. त्याने या नवदाम्पत्यासोबतचे काही फोटोही शेअर केले. या लग्नाला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यानेदेखील उपस्थिती लावली होती. तसेच बेनीची मैत्रीण आणि गायिका निती मोहन हीदेखील लग्नाला उपस्थित होती.
बेनीने पप्पू कान्ट डान्स साला, तू मेरी दोस्त है, कैसे मुझे, टर्कीबेन, दारू देसी आणि बँग बँग यांसारखी अनेक गाणी गायली आहेत.
1benny-dayal-dadlani