दिवसातले १०-१२ तास एकत्र काम करत करत मालिकेतल्या कलाकारांचं नातं हे कुटुंबात बदलतं. एकमेकांच्या अडीअडचणीच्या काळात ते एकमेकांचा भक्कम आधार बनून उभे राहतात. नुकतीच ‘भाबी जी घर पर है’ अभिनेत्री सौम्या टंडनने इंस्टाग्रामवरून दिवंगत अभिनेता दीपेश भानच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आवाहन केलंय. तिने एक व्हिडिओ शेअर केला आणि लोकांना दीपेशच्या कुटुंबाला ५० लाखांच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी देणगी आणि मदत करण्याची विनंती केली. त्याचबरोबर दीपेशसोबतच्या गोड आठवणीही तिने सांगितल्या.

व्हिडिओमध्ये सौम्या म्हणाली, “दीपेश भान आता आपल्यात नाहीत पण त्याच्या आठवणी अजूनही आपल्यासोबत आहेत. तो बोलका होता आणि तो अनेकदा त्याच्या घराबद्दल बोलत असे.  ते घर त्याने आपल्या गृहकर्ज घेऊन खरेदी केले होते. त्याचं लग्न झालं आणि त्याला मुलगाही झाला पण नंतर तो दीपेश आपल्याला सोडून गेला. आता त्याचे घर त्याच्या मुलाला परत करून आपण त्याची परतफेड करू.”
आणखी वाचा : अभिनेता विजय सेतुपती देणार शाहरुख खानला टक्कर, दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र

ती पुढे म्हणाली, “मी एक फंड तयार केला आहे आणि त्यात जी काही रक्कम जमा होईल ती दीपेशच्या पत्नीला दिली जाईल, ज्याद्वारे ती गृहकर्ज भरू शकेल. त्यामुळे कृपया दीपेशचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा.”

हेही वाचा : ‘आजोबा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतील का?’ लेकांनी विचारलेल्या प्रश्नावर जिनिलिया देशमुख म्हणते “पप्पा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे लिहीत, तिने तिच्या अकाऊंटवर फंड लिंक शेअर केली आहे. आणि पोस्टमध्ये जोडले, “दीपेश हा मी काम केलेल्या सर्वात गोड सहकलाकारांपैकी एक आहे. चांगल्या व्यक्ती कधीही दुर्लक्षित राहत नाहीत हे दाखवून देऊया.” दीपेश भानचा २३ जुलै रोजी क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. ‘भाबी जी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत त्याने मलखानची भूमिका केली होती. दीपेश सकाळी सातच्या सुमारास जिममध्ये गेला आणि नंतर दहिसर येथील त्याच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये क्रिकेट खेळत असताना बेशुद्ध पडला. त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगण्यात येत आहे. दीपेशच्या पश्चात त्याची पत्नी आणि अठरा महिन्यांचा एक मुलगा आहे.