छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे. ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. भाग्यश्री मेकअप डिझायनर विजय पलांडेला डेट करत आहे. ती बॉयफ्रेंड विजय पलांडेबरोबरचे फोटो देखील शेअर करत असते. आज विजयच्या वाढदिवसानिमित्र भाग्यश्रीने दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्वीने बॉयफ्रेंड करण कुंद्राला न सांगताच उरकला साखरपुडा? अभिनेता तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला….

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह! तू माझं सर्वात मोठं संरक्षण कवच आणि माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहेस! तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी देवाची आभारी आहे! तुझ्याबरोबर आयुष्य खूप सुंदर आहे! मी आपल्याबद्दल खूप लिहू शकते पण ते कधीच पुरेसं नसेल!” असं कॅप्शन लिहून भाग्यश्रीने विजयला निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त दिल्या आहेत. 

भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिला सोशल मीडियावर बॉडी शेमिंगवरून ट्रोल करण्यात आलं होतं. यावर तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘सोशल मीडियावर मी नकली राहू शकत नाही. माझा मीडिया आणि पोस्टकडे वास्तववादी दृष्टीकोण असतो आणि मी कायम अशीच राहीन. मला एका वर्षापासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे माझे वजन वाढत आहे. इतरांवर टिप्पणी करताना संवेदनशील असले पाहिजे हे तुम्हा सर्वांना कदाचित माहीत नसेल. त्यामुळे कृपया तुम्ही माझ्या कामाचे कौतुक करू शकत नसाल तर माझ्या फोटोंवरून मला ट्रोल करण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं होतं.  

Video : इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सी पुरूष कोण? या प्रश्नावर ऐश्वर्याने लाजत घेतलं होतं सलमान नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाग्यश्री ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’ या हिंदी मालिकांसाठी ओळखली जाते. ‘देवयानी’ ही तिची पहिली मराठी मालिका होती. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘शोधू कुठे’ हा भाग्यश्रीचा पदार्पणाचा मराठी सिनेमा होता. नंतर तिने ‘काय रे रास्कला’, ‘पाटील’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘विठ्ठल’ या सिनेमांमध्ये काम केलं.