कॉमेडियन भारती सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. भारती केवळ तिच्या विनोदामुळेच नाही, तर तिच्या साध्या आणि गोंडस स्वभावामुळेही चाहत्यांची आवडती आहे.

भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. याबरोबरच ती जवळजवळ दररोज यूट्यूबवर तिचे व्लॉग चाहत्यांसह शेअर करते. दरम्यान, भारतीचा लेटेस्ट व्लॉग चर्चेत आहे, जो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. या व्लॉगमध्ये भारती तिच्या मुलाच्या लाबुबू डॉलला जाळून टाकताना दिसत आहे.

भारती सिंगने जाळली लाबूबू डॉल

भारती सिंगने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केला आहे. १७:२८ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये कॉमेडियन तिच्या मुलाची आवडती लाबूबू डॉल जाळताना दिसत आहे. त्याबरोबरच ती सांगते की, जेव्हापासून ही डॉल तिच्या घरी आली आहे, तेव्हापासून तिच्या मुलाच्या वागण्यात खूप बदल झाला आहे. भारती ही डॉल एकटी जाळत नाही, तर तिच्या मुलाची आयादेखील तिच्याबरोबर हे काम करते. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, लाबूबू डॉल जाळताना आया खूप घाबरली आहे. त्याच वेळी भारतीचा पती आणि लेखक हर्ष लिंबाचिया हे सर्व पाहून धक्का बसला. भारती म्हणते की, ही डॉल आल्यानंतर तिचा मुलगा अधिकच खोडकर झाला होता.

जेव्हा भारतीने तिच्या मुलाला सांगितले की, ती लाबूबू डॉल जाळून टाकेल, तेव्हा तिचा मुलगा गोल्लाने सांगितले की, ती त्याची मैत्रीण आहे. त्यावर भारतीने त्याला सांगितले की, ती डॉल सैतान आहे. भारती म्हणाली, “लाबूबू आल्यापासून गोल्ला खूप खोडकर झाला आहे. सगळे म्हणाले आहेत की, मी अंधश्रद्धाळू आहे. जस्मिन, माझी बहीण असे सगळे म्हणतात की, ते सैतानाचे रूप आहे. ते जळतही नाही, ते तुझ्यामुळे जळत आहे गोल्ला. कारण- तू खूप खोडकर आहेस.” असं ती या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

व्लॉगमध्ये हर्ष लिंबाचिया म्हणाला, “हे लोक ते जाळण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ते जळत नाहीये, मला वाटतं की, त्याचा आत्मा प्रतिकार करू लागला आहे. आज तो नाही वाचणार.” लाबूबू डॉल जाळल्यानंतर भारती पुढे म्हणाली, “तर मित्रांनो, लाबूबू जाळला गेला आहे. सैतान मेला आहे, सैतान नेहमीच पराभूत होतो आणि देव नेहमीच जिंकतो. वाईटाचा पराभव आणि सत्याचा विजय.” भारतीचा हा व्लॉग व्हायरल होत आहे. त्यावर वापरकर्तेही प्रतिक्रिया देत आहेत.