Bhojpuri Cinema : बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीप्रमाणे भोजपुरी सिनेसृष्टीतील कलाकारदेखील घराघरात पोहचले आहेत. भोजपुरीमध्ये अनेक दमदार आणि हरहुन्नरी कालाकार आहेत. त्यांच्यातील एक खेसारी लाल यादव. खेसारी लाल यादवने आजवर आपल्या अभिनयाने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. तो कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या अभिनयासह विविध विषयांवर तो कायम त्याचं स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करतो.

त्याच्या स्पष्ट बोलण्याने अनेकदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र, खेसारी लाल कोणत्याही मुद्द्यावर व्यक्त होण्यास कधीच मागे हटत नाही, त्यामुळे सोशल मीडियावर कायम त्याची चर्चा असते. अशात आतादेखील खेसारी लाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चेत येण्याचं कारण त्याचा चित्रपट किंवा एखाद्या विषयावरील वक्तव्य नाही तर त्याचं जेवण आहे.

हेही वाचा : दिवसभर मद्यप्राषन कराचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

खेसारी लालने नुकताच त्याचा घरामध्ये जेवतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या ताटात अगदी सामान्य व्यक्ती खातात तेच पदार्थ आहेत. अभिनेत्याने भाजी, भाकरी आणि मिरची अशा पदार्थांसह त्याचं जेवण पूर्ण केलं आहे. तसेच हा फोटो पोस्ट करत त्याने भोजपुरी भाषेत “रोटी भुजिया एहिमे समाइल बा अपन दुनिया!”, अशी कॅप्शनसुद्धा दिली आहे.

खेसारीलाल त्याच्या अभिनयाच्या जोरावर कोट्यवधींचा मालक झाला आहे. मात्र, आजही तो त्याचे जुने दिवस विसरलेला नाही. त्याच्या जेवणाचा फोटो पाहून आजही तो किती साधं आयुष्य जगतो हे समजत आहे.

कोट्यवधींचा मालक आहे खेसारीलाल

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई आणि पटनामध्ये खेसारी लालचे फ्लॅट आहेत. त्यांची किंमत १.५ कोटी रुपये इतकी आहे. तसेच छपरा येथे त्याची वडिलोपार्जित जमीन आहे. त्याची किंमतदेखील लाखांच्या घरात आहे. अभिनेत्याकडे काही आलिशान गाड्यासुद्धा आहेत. तो एका चित्रपटासाठी तब्बल ५० ते ६० लाख रुपये मानधन घेतो. तसेच विविध कार्यक्रमांसाठी १० ते १५ लाख रुपये इतकं मानधन घेतो. त्यामुळे त्याची एकूण संपत्ती जवळपास १८ ते २० कोटी रुपये इतकी आहे.

काकांच्या मुलांसह खेसारी लाल यादवला एकूण सहा भावंडं आहेत. त्यांच्या संगोपनासाठी त्याचे वडील सुरुवातीला चणे विकायचे. खेसारी लालने काही दिवस नोकरीदेखील केली. मात्र, त्याला गाण्यांची आवड असल्याने त्याने ही नोकरी सोडली. त्यावेळी काही दिवस त्याने दिल्लीमध्ये रस्त्यावर लिट्टी-चोखासुद्धा विकला. मोठ्या संघर्षाने त्याने आज मनोरंजन विश्वात यश मिळवलं आहे. त्यामुळे आजही तो त्याचे जुने दिवस विसरलेला नाही व कोट्यवधींचा मालक असूनही साधं आयुष्य जगतो आहे. खेसारीलालचा हा फोटो पाहून चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांनी त्याचा फोटो पाहून गावची आठवण आल्याचं म्हटलंय.

हेही वाचा : “आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

View this post on Instagram

A post shared by Deepak Kumar (@khesari.lover.deepak)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेसारी लालच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, २०११ मध्ये त्याने सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. ‘साजन चले ससुराल’ हा त्याचा पहिलाच चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर ‘जान तेरे नाम’, ‘प्यार झुकता नही’ अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केलं आहे. लवकरच हा अभिनेता त्याच्या आगामी ‘राजाराम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.