प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. ती २५ वर्षांची होती. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. नुकतंच याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वाराणसीतील सारनाथ परिसरात हॉटेल सोमेंद्र या ठिकाणाहून आम्हाला माहिती मिळाली होती की, एका महिलेने रुम नं १०५ मध्ये गळफास घेतला आहे. ही माहिती मिळताच आम्ही संपूर्ण युनिटसह या ठिकाणी तातडीने घटनास्थळी दाखल झालो. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत आहे”, असा अंदाज आहे.
आणखी वाचा : Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था

Pregnant Woman, Injured by Falling Stone, Nerul, police register fir, Blasting Work Halted, navi mumbai news, marathi news, blasting for construction site, nerul construction site, construction site, builder construction site, nerul railway station west,
स्फोटप्रकरणी विकासकावर गुन्हा; नेरुळमधील स्फोटांचे काम बंद, नगररचना विभागाची विकासकाला कारणे दाखवा नोटीस
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी

“आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आंकाक्षा दुबे असे आहे. ती भोजपुरी चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करत होती. ती गेल्या काही काळापासून मुंबईत राहतेय. तिच्या कुटुंबियांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तिच्या रुममधून कोणतीही चिठ्ठी किंवा सुसाईड नोट मिळालेली नाही.

ती २२ मार्चपासून या हॉटेलमध्ये राहत होती. तिच्या चित्रपटाच्या शूटींगनिमित्ताने या ठिकाणी राहत होती. प्राथमिकदृष्ट्या तिच्या रुममध्ये काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. याप्रकरणी सर्वांचीच सखोल चौकशी केली जाईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा : Akanksha Dubey Suicide : १७ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण, २५ व्या वर्षी आत्महत्या; कोण आहे आकांक्षा दुबे? 

दरम्यान आकांक्षा दुबेचा जन्म मिर्झापूरच्या विंध्याचलमध्ये झाला. आकांक्षा ही ३ वर्षाची असतानाच ती तिच्या आई-वडिलांबरोबर मुंबईत स्थायिक झाली. टिकटॉक व इन्स्टाग्राम रील्समधून प्रसिद्धी मिळवलेल्या आकांक्षा दुबेने वयाच्या १७ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ती एसआरके म्युझिकबरोबर एका भोजपुरी अल्बममध्ये झळकली होती. पण तिच्या या म्युझिक अल्बमला तितके यश मिळाले नाही. त्यामुळे ती नैराश्यात गेली.

तिने २०१८ मध्ये सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. तिने भोजपुरी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण आईच्या सांगण्यावरुन ती पुन्हा काम करण्यास तयार झाली आणि पुन्हा सिनेसृष्टीत सक्रीय झाली. आकांक्षा दुबे मेरी जंग मेरा फैसला, मुझसे शादी करोगी, वीरो के वीर, फायटर किंग, कसम बदना वाले की २ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात झळकली.