प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. ती २५ वर्षांची होती. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस तिने आत्महत्या का केली याचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे तिचा इन्स्टाग्रामवरील शेवटचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.

आकांक्षा दुबेला ‘भोजपुरी क्वीन’ या नावाने ओळखले जायचे. ती वाराणसीमध्ये एका चित्रपटाच्या शूटींगसाठी आली होती. यावेळी ती सोमेंद्र हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. आकांक्षाने रविवारी दुपारच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आणखी वाचा : Akanksha Dubey Suicide : १७ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण, २५ व्या वर्षी आत्महत्या; कोण आहे आकांक्षा दुबे? 

आकांक्षा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. आकांक्षाने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. यावेळीचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती रडताना दिसत आहे. ती तोंडावर हात ठेवून ढसाढसा रडत असल्याचेही यात दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला रडण्यामागचे कारणही कमेंट करत विचारले आहे. मात्र तिने त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची २५व्या वर्षी आत्महत्या, हॉटेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्येनंतर सध्या पोलिस याप्रकरणाची चौकशी करत आहे. तिने नक्की आत्महत्या केली की तिचा खून झाला याबद्दल पोलीस चौकशी करत आहेत. आकांक्षाने वयाच्या २५ व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.