‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बादायकर यांचा सोमवारी रात्री अपघात झाला. पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. भुबन बड्याकार यांनी काही दिवसांपूर्वीच एक कार खरेदी केली होती. कार चालवायला शिकत असताना त्यांचा अपघात झाला. भुबन यांच्या छातीला दुखापत झाल्यानं त्यांना बीरभूमीमधील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याची प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुखापत झाल्यानं भुबन बड्याकार यांना थोडा त्रास होत आहे. मात्र त्यांच्या शरीरात कोणतंही फ्रॅक्चर सारखी कोणतीही दुखापत झालेली नाही. एक्स रे आणि सीटी स्कॅनमध्येही कोणतीही दुखापत झाल्याचं समोर आलेलं नाही. डॉक्टरांनी भुबन यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….

आणखी वाचा- काय? कंगनाच्या ‘Lock Upp’ मध्ये बाथरुमला चक्क दरवाजाच नाही!

भुबन बड्याकार हे पश्चिम बंगाल येथे राहतात. त्या ठिकाणी ते शेंगदाणे विकण्याचं काम करत असतानाच ‘कच्चा बादाम’ हे गाणं गात असत. एका व्यक्तीनं ते गाणं गात असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आणि भुबन बादायकर रातोरात स्टार झाले.

अलिकडच्या काळात भुबन यांनी मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये परफॉर्म देखील केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी एका म्यूझिक कंपनीसोबत गाणं गायलं आणि व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. ज्यातून त्यांना ३ लाख रुपये मिळाले होते. या म्यूझिक कंपनीनं भुबन यांच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आहे. याशिवाय भुबन यांच्या टॅलेंटसाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांचा सत्कार केला होता.