देशात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वैद्यकीय सेवांना असलेल्या मर्यादांमुळे अनेक रुग्णांना बेड न मिळणं, रक्त न मिळणं, ऑक्सिजनचा तुटवडा अशा समस्याही निर्माण होत आहेत. अशातच स्वयंप्रेरणेने मदत करायलाही काही लोक पुढे सरसावले आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरही त्यापैकीच एक. ती स्वतःला करोना योद्धा संबोधत आहे. असं काय काम करत आहे ती…जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री भूमी पेडणेकरला करोनाची लागण झाली होती. आता तिचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर लगेचच आता तिने एक छोटीशी मोहीम राबवण्याचं ठरवलं आहे. ती म्हणते की जास्तीत जास्त प्लाझ्मा दान करणारे लोक, औषधे पुरवणारे या सर्वांना लोकांशी जोडून देण्याचा प्रयत्न करेन. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “मी माझ्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करेन की मी रोज गरजू लोकांना काही संपर्क पाठवेन जेणेकरुन त्यांना मदत होईल. या क्रमांकांपैकी काही बनावटही असतील. असे बनावट संपर्क आढळून आल्यास मला कळवा. मी तात्काळ ते काढून टाकेन. मी माझ्या परीने हा छोटासा प्रयत्न करत आहे. आपण सगळे या लढ्यात एकत्र आहोत. ”

तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या चाहत्यांना असं आवाहनही केलं आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी तिला मेसेज करावा आणि आपल्या गरजेबद्दल योग्य ती माहिती द्यावी.

भूमीला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. तिने आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्याचबरोबर तिने करोनाच्या या दुसऱ्या लाटेला गांभीर्याने घेण्याची विनंती केली होती.

करोना पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी भूमी शशांक खैतान यांच्या ‘मिस्टर लेले’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. यात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशलही होता. त्यालाही करोनाची लागण झाली होती.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumi pednekar called herself corona warrior enabling new initiative vsk
First published on: 19-04-2021 at 19:45 IST