bhumi pednekar loss journey is very inspiring : बॉलीवूडच्या प्रतिभावान अभिनेत्री भूमी पेडणेकरने ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटासाठी तिचे वजन वाढवले होते. पण, त्या चित्रपटानंतर भूमीने अवघ्या चार महिन्यांत स्वतःला फिट आणि स्लिम बनवले.

भूमी पेडणेकर ही तिच्या कामासाठी, तसेच तिच्या परिवर्तनासाठी नेहमीच चर्चेत असते. असे नाही की भूमी नेहमीच स्थूल होती. उलट तिने त्या भूमिकेसाठी ३० किलो वजन वाढवले होते.

‘दम लगा के हईशा’ या चित्रपटाच्या तिच्या भूमिकेची तीच मागणी होती आणि ती पूर्ण करण्यासाठी भूमीने खूप मेहनत घेतली. त्यावेळी भूमी फक्त २५ वर्षांची होती. त्या भूमिकेबद्दल ती म्हणाली होती, “हा माझा आतापर्यंतचा आणि पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट होता. मला हा चित्रपट खूप आवडतो आणि मी तो असंख्य वेळा पाहिला आहे. या भूमिकेबद्दल अजिबात शंका नव्हती. मला दोन गोष्टी करण्यासाठी पैसे मिळत होते. एक म्हणजे खाणे आणि दुसरा म्हणजे अभिनय.”

आपल्या सर्वांना माहीत आहे की, वजन वाढवणे सोपे आहे; पण ते कमी करणे कोणाच्याही हातात नाही. चला जाणून घेऊया तिने इतक्या लवकर स्वतःला फिट कसे केले?

बटर चिकनचा नाश्ता

भूमीने सांगितले होते की, त्या भूमिकेसाठी स्वतःला धष्टपुष्ट करणे तिच्यासाठी खूप मनोरंजक होते. ती नाश्त्यात बटर चिकन खात असे. त्याबद्दल ती म्हणाली होती, “माझे नेहमीच लाड केले जात होते आणि खायला दिले जात होते. माझ्यातील खवय्या आनंदी होता. आणि माझ्यातील अभिनेता ते योग्य पद्धतीने करू इच्छित होता.” त्यांच्या मुलीला या मार्गावर जाताना पाहणे तिच्या कुटुंबासाठी सोपे नव्हते, विशेषतः तिच्या आईसाठी. त्याबद्दल,भूमीने सांगितले होते की, तिची आई कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेते. हेच कारण आहे की, तिने तिच्या दोन्ही मुलींना- भूमी आणि तिची धाकटी बहीण ‘कोक आणि चॉकलेट किड्स’ कधीही बनवले नाही.

भूमीने खुलासा केला की, ज्या काळात तिच्या वयाच्या मुली वजन कमी करण्यात आणि स्किनी जीन्स घालण्यात व्यग्र होत्या, त्या काळात ती दुप्पट पिझ्झा खात होती. “मी कधीच स्किनी मुलगी नव्हते; परंतु वजन कमी करण्याचा आणि अधिक तंदुरुस्त होण्याचा विचार करीत होते. मग ‘दम लगा के हईशा’ आला आणि मी पटकथा पाहून थक्क झाले. तो एक जुगार होता; पण मी कधीही अशी संधी सोडत नाही. संध्या (माझ्या पात्राबद्दल) मला शंका नव्हती.”

भूमीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, निरोगी दिनचर्येचे अनुसरण केल्यानंतर ती तिचे वजन कसे गाठू शकली. भूमीने आपले वजन कमी करण्याचा प्रवास संतुलित आहाराने सुरू केला. तिने तिच्या ‘फॅट टू फिट’ प्रवासाबद्दलही सांगितले. त्याबरोबरच तिने सांगितले की, ती उपाशी राहून बारीक झाली नाही, तर तिने डाएट प्लॅन घेतला आणि वर्कआउट केले. त्यामुळे ती आता खूप तंदुरुस्त झाली आहे. जेव्हा भूमीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिचे वजन ९० किलो होते. चित्रपटासाठी तिने ३० किलो वजन वाढवले आणि त्यानंतर तिने तितक्याच वेगाने वजन कमी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूमीने दिवसाच्या सुरुवातीपासून ते संपूर्ण दिवसभर तिच्या डाएट प्लॅनबद्दल सांगितले होते. ती रिकाम्या पोटी चहा पीत नाही, तर तीन बिस्किटांसह दूध-कॉफी पिते. त्यानंतर ती कामावर निघून जाते. कामावर गेल्यानंतर ती नाश्ता करते, ज्यामध्ये ग्रिल्ड सँडविचचा समावेश आहे. ती त्याचे चार भाग करते आणि खाते. भूमी खूप संतुलित आहार घेते. ती कसरत करण्यासाठी धावते. त्याबरोबरच ती पिलाटेस, रनिंग, स्ट्रेंथ व वेट ट्रेनिंग, अशी कसरत करते. त्यामुळे तिचे वजन नियंत्रणात राहते.