महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाने मराठी लोकांना खिळवून ठेवलं आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. त्यात आता लोकप्रिय विनोदविर भुवन बाम हजेरी लावणार आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शोचा प्रोमो हा हास्यजत्रा शोमधली अभिनेत्री नम्रता संभेरावने शेअर केला आहे. या प्रोमोत भुवन बाम प्रसाद खांडेकर यांच्या डॉक्टराच्या भूमिकेत येतो. यावेळी भुवन विनोद करत प्रसाद यांना कोणते आजार आहेत ते सांगताना दिसतो. हा प्रोमो शेअर करत “युट्यूबस्टार भुवन बाम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये दिसणार आहे”, असे कॅप्शन नम्रताने दिले आहे. भुवन बामला एका मराठी शोमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड आतुर आहेत.

आणखी वाचा : कपिल शर्मा एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतो इतके पैसे, अभिनेत्याचा खुलासा

आणखी वाचा : मुलीकडे KISS मागण्यावरून अभिजित बिचुकलेवर संतापली देवोलिनाची आई, म्हणाली…

आणखी वाचा : ‘अंगात आलया’ सिद्धूचा डान्स पाहून रणवीर सिंग फिदा कमेंट करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भुवन बामची ठिंठोरा ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एवढचं काय तर काही दिवसांपूर्वी भुवन बामने नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाइस्ट’ या सीरिजच्या संपूर्ण स्टार कास्टची मुलाखत घेतल्यामुळे चर्चेत आला होता.