छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचं ‘बिग बॉस हिंदी’चं पर्व काही विशेष कारणांमुळे चर्चेत राहिलं. ताजिकिस्तानचा अब्दू रोजिक ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. त्यामुळेच त्याने शोमधून एक्झिट घेतल्यानंतर चाहते नाराज झाले होते.बिग बॉसचे पर्व संपले असले तरीदेखील चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ आहे. त्यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.
अब्दूचा चाहतावर्ग मोठा आहे, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील त्याची चर्चा सुरु आहे. नुकतीच त्याने माध्यमांसमोर एक घोषणा केली आहे. लवकरच त्याला मुंबईत स्वतःचे हॉटेल सुरु करायचे आहे. त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
‘हेरा फेरी ३’ मध्ये असणार ‘हा’ ट्विस्ट; खुद्द परेश रावलांनी केला खुलासा
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो पत्रकारांना सांगतो “तुमच्यासाठी माझ्याकडे एक बातमी आहे. मी लवकरच एक रेस्टॉरंट सुरु करत आहेत तुम्ही सगळ्यांनी नक्की या,” त्याचा हा व्हिडीओ विमानतळावरचा दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. अब्दू आता लवकरच सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एका गाण्यात दिसणार आहे.
ताजिकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवलेला अब्दू हा गायक आहे. १८ वर्षीय अब्दूच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.