‘बिग बॉस ओटीटी’ शो सध्या अनेक कारणांमुळ चर्चेत आहे. या शोमध्ये येत्या भागात बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी हजेरी लावणार आहे. अर्थातच सनीच्या येण्याने शोमध्ये बोल्डनेसचा तडका पाहायला मिळणार हे नक्की. मात्र सनीने ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात स्पर्धकांना असा काही टास्क दिलं ज्यामुळे स्पर्धकांसोबतच नेटकऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’च्या नव्या प्रोमोमध्ये सनी लिओनीने स्पर्धकांना एक टास्क दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हा विचित्र टास्क पाहून आता नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय.

या व्हिडीओत सनीने स्पर्धकांना असा काही टास्क दिलाय की ज्यामुळे काही स्पर्धक देखील हैराण झाले आहेत. या टास्कमध्ये स्पर्धकांना एकमेकांच्या खूपच जवळ उभ राहायचं आहे. दोघाच्या शरीरांमध्ये त्यांना एक नारळ पकडायचा आहे. शिवाय हा नारळ खाली पडू न देता त्यांना डान्स करायचा आहे. तसचं हळू हळू हा नारळ चेहऱ्यापर्यंत आणायचा आहे. या विचित्र टाक्समध्ये स्पर्धकांना शारिरीकपणे खूपच जवळ यायचं आहे. तर स्पर्धकदेखील टास्क पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतं आहेत. मात्र हा विचित्र टास्क पाहून नेटकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हे देखील वाचा: “आम्ही मामा कधी होणार?”; फोटोग्राफर्सच्या प्रश्नावर भारती सिंहने दिलं धमाल उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

हे देखील वाचा: “इथे ये आणि आधी मला किस कर”, शमिताने शेट्टीने ऑर्डर सोडताच राकेश बापटनेही…

काही स्पर्धक अगदी सहजपणे हा विचित्र टास्क करताना दिसत आहेत. तर काही स्पर्धकांनादेखील हा टास्क करताना संकोच वाटतं असल्याचं दिसतंय. काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत म्हंटलंय. “हे बिग बॉस आहे की स्प्लिट्सविला” तर एक नेटकरी म्हणाला , “अत्यंत घाणेरडा टास्क आहे.” तर आणखी एक युजर म्हणाला, “जास्त टीआरपीसाठी बिग बॉस ओटीटी खालच्या दर्जाचे स्टंट करून घेत आहे.” तर अनेकांनी हे खूपच अश्लील असल्याचं म्हणत टीका केली आहे.

big-boss-ott-task
(Photo-Instagram@voot)

 

सनी लिओनी स्प्लिट्सविला हा शो होस्ट करत असून या शोमध्ये स्पर्धकांकडून ती असे अनेक टास्क करून घेते. या शोमध्ये अनेक बोल्ड टास्क पाहायला मिळतात. मात्र ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो कौटुंबिक शो असूनही असे विचित्र टास्क पाहिल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.