बिग बॉस १५ मध्ये सध्या मोठे खुलासे होताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका टास्क दरम्यान घरातील सदस्यांनी एकमेकांबाबत वेगवेगळे खुलासे केले आहेत. ज्यामुळे प्रेक्षकही हैराण झाले आहेत. बिग बॉसच्या घरात ‘पर्दाफाश रिपोर्टिंग’ हा टास्क नुकताच पार पडला. यावेळी घरातील सदस्यांनी एकमेकांची गुपितं उघड केली. ज्यात देवोलिनाचं बालपणीच लग्न झालं असल्याचाही खुलासा झाला. ज्यामुळे घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला होता.

बिग बॉसच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, घरातील ‘पर्दाफाश रिपोर्टिंग’ दाखवण्यात आलं आहे. ज्यात घरातील सदस्य एकमेकांची पोलखोल करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये राखी सावंतनं देवालिनाबाबत मोठा खुलासा केला आहे. देवोलिनाबद्दल बोलताना राखी म्हणाली, ‘देवोलिनाचं आधीच लग्न झालेलं आहे.’ राखीचं बोलणं ऐकून घरातील सदस्यांना धक्का बसतो. सर्वजण देवोलिनाला तिच्या लग्नाबद्दल विचारतात तेव्हा ती म्हणते, ‘हो माझं बालपणी एका केळीच्या झाडासोबत लग्न झालं आहे.’ तिचं उत्तर ऐकल्यावर प्रेक्षकांसह घरातील सदस्य हैराण होतात.

याशिवाय या टास्कमध्ये अभिजित बिचुकले आणि राखी सावंत यांच्याबद्दल मोठे खुलासे झाले. तेजस्वी प्रकाशनं अभिजित बिचुकलेबाबत एक धक्कादायक खुलासा केलं. ती म्हणाली, ‘अभिजित बिचुकलेनं एका म्युझिक व्हिडीओसाठी ६ तासांचा किसिंग सीन दिला आहे.’ तेजस्वीचा बिचुकलेबाबत हा खुलासा ऐकल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्य हैराण झालेला पाहायला मिळाला. तसेच देवोलिनानं, राखी सावंत दोन वेळा तुरुंगात जाऊन आल्याचा खुलासा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना काही पत्रकार प्रश्न विचारताना दिसले. यावेळी रश्मि देसाई आणि अभिजित बिचुकले यांच्या जोरदार वाद झालेला पहायला मिळला. अभिजित बिचुकले केवळ घरातील सदस्यांशीच नाही तर गेस्टसोबतही बेशिस्तपणा करताना आणि त्यांना उलट उत्तर देताना दिसला. ज्यामुळे सलमान खान आणि अभिजित बिचुकले यांच्यात वाद झाले. घरातील सदस्यांसोबतच सलमान खानही अभिजित बिचुकलेवर चिडलेला दिसला.