टीव्ही होस्ट आणि अभिनेता जय भानुशाली हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शनिवारी २ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस’च्या १५ व्या सिझनचा ग्रँड प्रीमियर पार पडला. यावेळी जय बिग बॉसच्या घरात जाणारा पहिला स्पर्धक ठरला. स्वता: शोचा होस्ट सलमान खानने त्याला बिग बॉसचे घर दाखवले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जय हा बिग बॉसच्या १५ व्या सिझनचा सर्वाधिक फी घेणारा स्पर्धक ठरला आहे. हो, खरं तर जय ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभागी होणार हे शेवटच्या क्षणी ठरले. त्यामुळे शोमध्ये जाण्यापूर्वी जयचा कोणताच प्रोमो वाहिनीने शेअर केला नव्हता.
शेवटच्या क्षणी घरात येण्याचा निर्णय घेऊन जयने त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. यापूर्वी पाहुणा म्हणून जय अनेकदा बिग बॉसच्या घरात आला आहे. मात्र पहिल्यांदाच तो स्पर्धक म्हणून बिग बॉस च्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. जयच्या एका दिवसाची फी तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला शॉक बसेल. जय एका दिवसासाठी 1 लाख 65 हजार रुपये चार्ज करतो म्हणजे एका आठवड्या तो ११ लाख रुपये कमावतो.
दरम्यान शोच्या पहिल्या दोन दिवसातच घरात जय आणि प्रतीक सेजपाल मध्ये मोठे भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसने एका नव्या टास्कची घोषणा केली, यामध्ये जंगलवासियांना एक नकाशा देण्यात आला होता. प्रतीक सेजपाल नकाशा चोरतो आणि लपवतो. यामुळे जय आणि प्रतीकमध्ये भांडण होते.हा वाद एवढा वाढतो की शेवटी भांडणं हाणामारी पर्यंन्त पोचते , प्रतीक चिडतो आणि तो घरात असलेल्या काचेच्या दारावर दणके देत राहतो आणि शेवटी काच फुटते. बिग बॉस १५ चा हा सिझन पाहण्यासाठी सगळेच खूप आतुर आहेत. प्रतीक आणि जय मध्ये झालेल्या वादाचा परिणाम काय होईल ते वीकेण्ड का वार या एपिसोडमध्ये बघायला मिळेल.