scorecardresearch

काका बसुया, रिश्ता पक्का करूया; तोडकं मोडकं मराठीत करण कुंद्राने तेजस्वीच्या आई-वडिलांसमोर घातली लग्नाची मागणी

तेजस्वी आणि करणचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

salman khan, tejasswi prakash, karan kundra,
काका बसुया, रिश्ता पक्का करूया; तोडक मोडक मराठीत करण कुंद्राने मराठीत तेजस्वीच्या आई-वडिलांसमोर घातली लग्नाची मागणी

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये एकतरी लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी शोमधला पंजाबी मुंडा करण कुंद्रा आणि आपली सगळ्यांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांची लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता त्यांच्या लव्हस्टोरीवर तेजस्वीच्या घरच्यांची कशी प्रतिक्रिया आहे हे सलमानने सगळ्यांना दाखवून दिलं आहे. त्याची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये तेजस्वी प्रकाशचे आईवडिल व्हिडीओ कॉलद्वारे शो मध्ये सामिल झाले होते. तेव्हा सलमान त्यांना सरळ करण विषयी विचारतो. सलमान बोलतो की, “करण तुम्हाला कसा वाटतो? जावई पसंत पडला की नाही?” त्यावर तेजस्वीचे आई-वडील बोलतात “जावई आवडला.” हे ऐकल्यानंतर करण मराठीत बोलतो, “काका-काकू तुमच्याशी बोलून बरं वाटलं.” त्यानंतर करण “काका बसूया आणि रिश्ता पक्का करूया”, असं बोलतो.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

पुढे करण हे बोलत असताना मद्यपानाविषयी बोलत असल्याचे दाखवतो. हे पाहिल्यानंतर सगळेच हसू लागतात. तर तेजस्वीची वडील बोलतात “ठीक आहे आओ, खंबा खोलेंगे.” त्यावर मध्येच सलमान बोलतो, “हा तुमचा बेवडा जावई.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून प्रेक्षक यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 15 karan kundra tells tejasswi prakashs father he will have drink with him if rishta is pakka dcp