छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस १५’मध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून अभिजीत बिचुकले, राखी सावंत आणि तिचा पती रितेश, देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई यांची एण्ट्री झाली. बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी राखी सावंतची ओळख आहे. सध्या राखी आणि तिचा पती रितेश हे दोघेही बिग बॉसमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच स्पर्धक हे कोणतीही कसर सोडताना दिसत नाही.

नुकतंच बिग बॉस हिंदीचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यात बिग बॉसने घरातील सर्व स्पर्धकांना एक टास्क दिला आहे. या टास्कदरम्यान काही स्पर्धकांना चोर बनवण्यात आले आहे. यात त्या स्पर्धकांना एका संग्रहालयातून काही वस्तूंची चोरी करण्यास सांगितले आहे. या संपूर्ण टास्कची संचालक म्हणून राखीला नेमण्यात आले आहे.

राखी सावंत ही हा टास्क सुरु होण्यापूर्वी शमिता शेट्टीला काही गोष्टी लपवून ठेवण्यास सांगते. शमिता या टास्कमध्ये चोर बनली असून राखी तिला सांगते, ‘जेव्हा इतर स्पर्धक भांडण्यात व्यस्त असतील तेव्हा मी सर्वांचे लक्ष विचलित करत त्यांना व्यस्त ठेवेन. यानंतर ती शमिताच्या अंर्तवस्त्राकडे हात दाखवत म्हणते, तू चोरी कर आणि लपव.’

शिल्पा शेट्टीलाही मिळाले नाही ‘Spider Man’ चे तिकीट, गयावया करत म्हणाली…

राखीचे हे बोलणे ऐकून शमिता चकित होऊन तिच्याकडे बघते आणि विचारते, “अरे पण ही या सर्व गोष्टी अंर्तवस्त्रामध्ये कशा काय लपवू? यावर राखी म्हणते, देवाने आपल्याला काही दिले असो वा नसो, आपल्या फिक्स तिजोरी मात्र नक्की दिली आहे. राखीचे हे बोलणे ऐकून शमिता हसू लागते आणि आय लव्हू यू राखी असे म्हणते.”

दरम्यान राखी सावंत ‘बिग बॉस 15’ ची पहिली फायनलिस्ट बनली आहे. नुकतंच बिग बॉसने अंतिम स्पर्धकांसाठी एक कार्य दिले होते. मात्र यावेळी स्पर्धकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा टास्क रद्द करण्यात आला.