छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, आता हा शो अजुन दोन आठवडे आपलं मनोरंजन करणार आहे. शो २ आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. ही माहित सलमानने सगळ्या स्पर्धकांना दिली. यावेळी राखी सावंत तर आनंदीत झाली. पण इतर सदस्यांना हा मोठा धक्का होता. पण सगळ्यात जास्त नाराज शमिता शेट्टी झाली होती.

ही बातमी कळल्यानंतर राखीला आनंद झाला आणि ती मोठ्याने ओरडत तिचा आनंद व्यक्त करत होती. यावेळी शमिता राखीला शांत रहायला सांगते आणि बोलते बिग बॉसना त्यांची घोषणा पूर्ण करू दे. त्यानंतर शमिता निशांत भट्टसोबत या विषयी किचन एरियामध्ये बोलत असते. तेव्हा शमिता बोलतो, ‘अभिजीत बिचुकले आणि राखी सावंतसारख्या लोकांसोबत ती या घरात एक दिवससुद्धा राहू शकतं नाही. अभिजित हा पुरुषी अहंकार बाळगणारा आहे. तर राखी नेहमी तिच्या खांद्याच्या दुखापतीवर विनोद करत असते.’

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री करणार दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत काम

शमिता पुढे निशांतला विचारते, ‘ती हा शोसोडून जाऊ शकते का आणि ती कोणत्याही गोष्टीत सहभागी होणार नाही.’ त्यानंतर राखी शमिताजवळ जाते आणि बोलते, ‘तू मला तुझी बहिण का नाही समजतं आणि माझ्यासोबत गोष्टी का शेअर करत नाही.’ यावर शमिताबोलते, ‘तिची प्रतिक आणि निशांतसोबत चांगली मैत्री आहे.’

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘तुला चप्पलने मारेन’, नेहा भसीनची धमकी ऐकताच बिचुकलेचा चढला पारा म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर राखी पुन्हा एकदा अभिजीत बिचुकलेसोबत शमिताच्या खांद्यावर असलेल्या दुखापतीवर विनोद करते. राखी बोलते, ‘फिनाले असेल आणि सुत्रसंचालक जेव्हा तिचा हात वर करेन तेव्हा तिचं दुखनं गायब होणार.’ दुसरीकडे अभिजीत म्हणाला, ‘शमिता स्वत:ला असुरक्षित समजते कारण मी आता जिंकण्याच्या स्पर्धेत आहे.’