बिग बॉस ७ : तनिषाचा टास्कला नकार

दिवसागणीक ‘बिग बॉस’च्या घरातले वातावरण तापत आहे. स्पर्धकांचा ‘इगो क्लॅश’ होत असून, एकमेकांमधला दुरावा वाढत आहे. ‘टिकेट टू फिनाले’ टास्कच्या दुसऱ्या दिवशी अरमान, कुशाल आणि गौहर…

दिवसागणीक ‘बिग बॉस’च्या घरातले वातावरण तापत आहे. स्पर्धकांचा ‘इगो क्लॅश’ होत असून, एकमेकांमधला दुरावा वाढत आहे. ‘टिकेट टू फिनाले’ टास्कच्या दुसऱ्या दिवशी अरमान, कुशाल आणि गौहर बिग बॉसच्या ‘ग्रॅण्ड फिनालेसाठी’साठी डायरेक्ट नामांकीत होण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले आहेत.
या नंतर ‘बिग बॉस’द्वारे ‘राजनिती’ हा टास्क देण्यात आला आहे. ज्यात संग्राम, तनिषा, कामया, अॅण्डी आणि एजाझ हे नेते झाले आहेत. त्यांना गौहर, कुशाल आणि अरमानवर आपला प्रभाव टाकत त्यांचे समर्थन मिळवायचे आहे. परंतु, खुशाल आणि गौहरमुळे तनिषा या टास्कचा भाग होण्यास नकार देते. या विषयी अॅण्डीशी चर्चा करताना ती म्हणते, आत्मसन्मानापेक्षा माझ्यासाठी काहीही मोठे नाही, मी हा टास्क करणार नाही. ज्यात कुशाल आणि गौहरशी थेट संवाद साधावा लागेल. कुशाल आणि गौहरबरोबर एकाच छता खाली राहणे सुध्दा आपल्यासाठी कठीण असल्याचे ती अॅण्डीला सांगते. काही वेळाने तनिषा आणि अरमान चर्चा करत बसलेले दिसतात. परंतु, कुशाल त्या ठिकाणी येताच तनिषा उठून निघून जाते. दरम्यानच्या काळात गौहर आणि कुशाल ‘राजनिती’ टास्कमध्ये तनिषाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना बनवतांना दिसतात. ‘टिकेट टू फिनाले’द्वारे कोणाला फायनलमध्ये ‘डायरेक्ट एन्ट्री’ मिळेल हे अजून गुलदस्त्यात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 7 tanishaa refuses to be a part of the task

ताज्या बातम्या