चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर दिली. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.
प्रिन्स नरूला, मंदाना करिमी, ऋषभ सिन्हा आणि रोशेल मारिया राव हे बिग बॉसच्या नवव्या पर्वाचे फायनलिस्ट होते. बिग बॉसचा विजेता म्हणून सलमान खानने प्रिन्सचे नाव घेतले त्यावेळी त्याला भावना अनावर झाल्या होत्या. सलमानच्या हस्ते त्याला ३५ लाख रुपयांचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली. मिळालेल्या रकमेतील पाच लाख रुपये प्रिन्स हा सलमान खानच्या ‘बिईंग ह्युमन’ संस्थेला दान करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धकांना मिळालेली मतेः
प्रिन्स नरूला- ३५,१८,९०९
मंदाना करिमी- ३४,०१,८८९
ऋषभ सिन्हा- ३२,६७,००८
रोशेल मारिया राव- २७,५६,७०८
बिग बॉससह प्रिन्स आत्तापर्यंत तीन रियालिटी शोचा विजेता ठरला आहे. यापूर्वी तो वयाच्या २५ व्या वर्षी एमटीव्ही रोडिज एक्स २ आणि एमटीव्ही स्प्लीटव्हिला ८ चा विजेता झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2016 रोजी प्रकाशित
३५,१८,९०९ मतांनी प्रिन्स नरुला ठरला ‘बिग बॉस’चा विजेता
बिग बॉससह प्रिन्स आत्तापर्यंत तीन रियालिटी शोचा विजेता ठरला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 24-01-2016 at 17:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 9 winner is prince narula