कॉमेडियन भारती सिंह ही सध्या ‘द कपिल शर्मा शो’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. भारती ही टीव्ही क्षेत्रातील पहिली महिला कॉमेडीयन आहे. आपल्या विनोदाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. भारती आपल्या बॉडीबद्दल अनेकदा विनोद करताना दिसते. मात्र आता भारतीने तब्बल १५ किलो वजन कमी केलं आहे. यासाठी तिचे सगळीकडून कौतुक होताना दिसत आहे. आता तिची मैत्रीण आणि ‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री जास्मीन भसीनने या मागचे गुपित काय आहे याचे बिंग फोडले आहे.

भारती सिंहचा शो ‘द खत्रो शो’ साठी अभिनेत्री जास्मीन भसीन गेस्ट म्हणून आली होती. यावेळेस शूटच्या दरम्यान तिने सेटवरील भरपूर व्हिडीओ शेअर केले होते, यातील एका व्हिडीओमध्ये तिने भारतीचे डाएट काय असते ते देखील दाखवले आहे. जास्मीनने शेअर केलेल्या व्हिडीओत भारती जेवताना दिसत आहे. या क्लिपमध्ये भारती तिची जेवणाची प्लेट सजवताना दिसत आहे. प्लेटमध्ये भात आणि तूप घेतले. नंतर डाळ घेताना दिसली त्यावेळेस जास्मीन “तुपाने युक्त डाळीचा तडका आणि हे आहे भारतीच्या वजन कमी करण्या पाठचे गुपित आहे”, असे सांगितले आहे. तसंच भारती म्हणते “सगळे सांगत आहेत की मी बारीक होत चालली आहे, कोणत्या वेळेस मी जेवते आहे तेबघा .” व्हिडीओच्या शेवटी भारतीच्या बारीक होण्याचे हे कारण सांगताना म्हणते, “चार चमचे तूप, तेलात बनवलेली बटाट्याची भाजी आणि डाळ हे आहे भारती सिंहच्या वजन कमी होण्या मागचे कारण”, असे जास्मीन बोलताना दिसत आहे.

भारतीचा हा खास डाएट वाला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हयरल झाला आहे. तसंच भारतीच वजन कमी झालेले पाहुन अनेक लोक तिचे कौतुक करताना दिसत आहे. भारतीने गेल्या एक वर्षात जवळपास १५ किलो वजन कमी केले आहे. याबाबत बोलताना तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे, “माझे वजन आता ९१ वरुन ७६ किलो झाले आहे. एवढे किलो वजन कमी झाल्याचे समजल्यानंतर मी स्वत:च चकित झाली आहे. पण त्यासोबतच मला याचा आनंदही आहे. वजन कमी केल्यानंतर आता मला निरोगी आणि तंदुरुस्त वाटतं आहे, दमही लागत नाही. तसेच शरीर हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. विशेष म्हणजे यामुळे मला मधुमेह आणि दम्याचा त्रास कमी झाला आहे,” असे भारतीने सांगितले.

भारती इंटरमिटेंट फास्टिंगने तिचे वजन कमी करते, तिने सांगितलं की तू सायंकाळी सात वाजल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी बारा वाजे पर्यंत काही खात नाही. तसच डाएट सोबत व्यायाम देखील करत असल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले. भारतीचे असे म्हणणे आहे जर का तुम्ही स्वत:च्या शरीरावर प्रेम केलं तर तुमच्यावर कोणी प्रेम करेल. त्यामुळे तिने  स्वत:कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.