छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. बऱ्याच वेळ बिग बॉसमुळे अनेक कलाकार प्रकाश झोतात येतात त्याच बरोबर त्यांचा मोठा चाहतावर्ग देखील निर्माण होतो. सध्या बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही चर्चेत आहे. या चर्चा तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या आहेत. या फोटोमुळे काही चाहत्यांनी तर रुपाली प्रेमात पडली आहे असा अंदाज देखील वर्तवला आहे.

रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंकित मगरे सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनवरुन रुपाली अंकितला डेट करत असल्याचे म्हटले जाते. ‘एखाद्याला सर्वात चांगली भेट देणे म्हणजे तुमचा वेळ आणि प्रेम देणे.. मी तुझी प्रिन्सेस आहे…’ असे कॅप्शन तिने दिले होते. या फोटोच्या कॅप्शनवरुन ते दोघे रिलेशनमध्ये असल्याचे दिसत आहे. अंकित मगरेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुपालीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले जाते.

कोण आहे हा अंकित मगरे?

अंकित मगरे दुसरा तिसरा कोणी नसून चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे. तसेच तो एक उद्योजकही आहे.