छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यातील एक अभिनेता म्हणजे पराग कान्हेरे. पराग हा ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. तो एक प्रसिद्ध शेफ आहे. सध्या तो त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

पराग हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. परागने काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला, “तुमचे पुन्हा स्वागत बरका… मला टरबूज सलाद म्हणून खूप आवडतात…लोकांनी कितीही टीका केली तरी टरबूज हा शरीरसाठी चांगला असतो. सवयी बदला, जीवन बदलेल”, असे त्याने ही पोस्ट करताना म्हटले आहे.

“एक उत्कंठावर्धक वळण…”, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामान्यानंतर आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान परागच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अरे पराग भाव…आता टरबूजाबरोबर ..प्रताप सरनाईक वगैरेंची काकडी पण आहे रे तुला सैलैड म्हणून खायला, अशी कमेंट एकाने केली आहे. तर अनेकांनी त्याची ही पोस्ट राज्यातील राजकारणाासंबंधित असल्याचे म्हटलं जात आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया, म्हणाली “धन्यवाद उद्धवजी…”

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात महाविकासआघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचे आमदार फुटल्याने त्यांना २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.