छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घेऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना कोणते नवीन चेहरे दिसणार?, यंदा काय वेगळं असेल?, यंदाचं घर कसं असेल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेच असतील. यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ तुमच्या अपेक्षा पेक्षा जास्त ग्रँड असणार आहे. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माते या वेळेस काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या शो मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना काटेकोरपणे या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा सेट ग्रँड असून थीम नुसार डिझाइन करण्यात आले आहे. हा सेट गोरेगावच्या फिल्म सिटी येथे उभारण्यात आला आहे. कोविड नियमांचे पालन करत घरात येणाऱ्या स्पर्धकांना क्वारंनटाईन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकांची टेस्ट देखील केली जाईल. तसंच वेळोवेळी घरातील स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल, सॅनिटायझेशन ही करण्यात येणार आहे. घरात वाइल्ड कार्ड पकडून एकूण १६ स्पर्धक सहभागी होणार आहेत.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बिग बॉसचं घर सज्ज झालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसर्‍या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. त्यांचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तेव्हा लवकरच समजेल कोण कोण असणार आहेत या सिझनमधील सदस्य?  कसे असणार यावेळेचे घर? आणि काय नवीन पहिला मिळणार आहे या सिझनमध्ये? यासाठी प्रेक्षकांना १९ सप्टेंबरची प्रतिक्षा करावी लागणार आहे.