‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सिझन दिवसेंदिवस आणखीन रोमांचक होतं चालला आहे. नवीन ट्विस्ट आणि टास्कमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होतं आहे. बिग बॉसच्या घरात दरोज नवीन टास्क पाहायला मिळतात. काल स्पर्धकांना ‘हल्लाबोल’ हा टास्क देण्यात आला. यात घरातील सदस्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली. या टास्कमध्ये एका ग्रुपला मोटरसायकलवर बसायचे आहे. तर समोरची टीम त्यांना उठवण्याचा प्रयत्न करेल.
हल्ला बोल या टास्कचा आज दुसरा दिवस आहे. कलर्स वाहिनीने आजच्या एपिसोडची झलक त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात टास्कच्या दुसऱ्या दिवशी घरात विशाल निकम आणि अक्षय वाघमारेमध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. टास्कच्या दरम्यान विशाल मोटेरसायकलवार बसलेल्या सदस्यांवार पाणी फेकताना दिसत आहे. यावेळी अक्षय त्याच्या अंगावर पाणी फेकलं आहे असा आरोप विशालवार करताना दिसला. यावर नंतर विशाल आणि अक्षय एकमेकांवर चढताना दिसतात. विशाल अक्षयला हात लावून दाखव, असे बोलताना दिसला. तर दुसरीकडे अक्षय मला डोकं आहे म्हणत त्याला उत्तर देत आहे, हे देखील या प्रोमोत पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिले, ‘जयची टीम चिडकी आहे’. ‘हे भेदभाव करतात’, असे दुसऱ्या युजरने लिहिले. या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. चाहते अक्षय आणि विशाल मध्ये नेमकं काय झालं आहे हे जाणून घेण्यासाठी ते आजच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सिझन तुम्ही दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहू शकता. तसंच २४/७ हा शो तुम्ही वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल .