‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सिझन दिवसेंदिवस आणखीन रोमांचक होतं चालला आहे. नवीन ट्विस्ट आणि टास्कमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होतं आहे. बिग बॉसच्या घरात दरोज नवीन टास्क पाहायला मिळतात. एखादं टास्क पूर्ण करण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जिवापाड मेहनत घेताना दिसतात, एकमेकांना चॅलेंज करताना दिसतात. नुकत्याच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ‘हल्लाबोल’ टास्कच्या दरम्यान अभिनेता विकास पाटील मीरा जगन्नाथला चॅलेंज करताना दिसत आहे.
कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या टास्कचा व्हिडीओ शेअर केला आहे. बिग बॉस स्पर्धकांना ‘हल्लाबोल’ नावाचा टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली. यात टीम A मध्ये मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने. तर टीम B मध्ये विकास पाटील, विशाल निकम, अविष्कार दारव्हेकर, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील. या टास्कमध्ये एका ग्रुपला मोटरसायकलवर बसायचे आहे आणि समोरची टीम त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. या टास्कच्या दरम्यान गायत्री आणि मीरा विशालला टार्गेट करताना दिसतात. मीरा त्याला म्हणते, “तुला या घरात अफेअर करायचं आहे…. तर ते तू फक्त फेक मुलींसोबतचं कर. तुला आयुष्यात खऱ्या मुली भेटणारचं नाहीत.”
पुढे व्हिडीओमध्ये विकास म्हणताना दिसला, “मी तुला कॅमेरासमोर चॅलेंज करतो हिंमत असेल तर उद्या तुम्ही पहिले येऊन दाखवा.” या व्हिडीओत विकास आणि विशाल मीरावर चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळत आहे. तर मीरा आणि गायत्री देखील त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत विकास आणि विशाल मीरावर चिडले असल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून या टास्क दरम्यान नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सिझन तुम्ही दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहू शकता. तसंच २४/७ हा शो तुम्ही वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल .