अभिनेता राकेश बापट हा टीव्ही आणि चित्रपटातला लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या राकेश कलर्सवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’ ओटीटी व्हर्जनमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी राकेशने पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगराने काय प्रतिक्रिया होती ते एका मुलाखतीत सांगितले आहे.
राकेश बापट बिग बॉसमध्ये सहभागी होणार हा त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबद्दल रिद्धी काय प्रतिक्रिया होती? हे जेव्हा त्याला विचारले तेव्हा त्याने ‘स्पॉट बॉय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ” माझ्या इंडस्ट्रीमधील कोणत्या ही मित्राला माहिती नव्हते की मी या शोमध्ये सहभागी होतो आहे. कारण मला सगळ्यांना सरप्राइज द्यायचे होते. म्हणून मी रिद्धीला सांगितले पण….ती म्हणाली मला माहीत नाही की तु किती चांगलं करशील…कारण तिथे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा स्वभाव वेगळा आहे…यावर मला फक्त शुभेच्छा दे असं मी तिला सांगितले.”
View this post on Instagram
राकेश आणि रिद्धीचा घटस्फोट हा त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. २०१९ साली आपसी सामंजस्याने ते दोघं वेगळे झाले. राकेशला जेव्हा विचारलं की या मुद्याची चर्चा शोमध्ये होणार का? त्यावर राकेशने सांगितले की,”माझे लग्न आणि घटस्फोट हे सर्व उघडपणे झाले आहे. आम्ही यातून बाहेर पडण्याचा अत्यंत स्वाभाविक मार्ग स्वीकारला आहे. आणि एकमेकांबद्दल खूप आदर ही आहे. आम्ही कधीही एकमेकांवर कोणते ही आरोप केले नाहीत आणि यापुढे देखील असे काही होणार नाही याची मला खात्री आहे.”
राकेश बापटला आपण ‘तुम बिन’,’दिल विल प्यार व्यार’, ‘नाम गुम जाएगा’, ‘गिप्पी’ या हिंदी चित्रपटांबरोबरच ‘वृंदावन’, ‘सविता दामोदर परांजपे’ अश्या मराठी चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारताना पाहिले आहे.