scorecardresearch

Bigg boss ott विजेती दिव्या अग्रवाल झाली तृतियपंथी?

दिव्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

bigg boss ott, divya agarwal,
दिव्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’ विजेता दिव्या अग्रवाल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मी़डियावर फोटो आणि व्हि़डीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की ती दिव्य़ाच आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. दिव्याचा तृतियपंथीच्या वेषातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिव्याने तृतियपंथीच्या भूमिकेसाठी हा लूक केला आहे. या व्हिडीओत दिव्याने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. दिव्याच्या चेहऱ्यावर दाढी दिसत आहे. दिव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “फक्त बॉलिवूडवर…”; क्रांती रेडकरने NCB च्या कारवाईवर व्यक्त केली प्रतिक्रिया

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

दिव्या ऑल्ट बालाजीच्या ‘कार्टेल’ सीरिजमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये दिव्या सीरियल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. याच सीरिजमध्ये दिव्या तृतियपंथीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिव्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात दिव्या वृद्ध व्यक्तीच्य़ा भूमिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-10-2021 at 13:45 IST

संबंधित बातम्या